मुंबई

रोह्यात छ. शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

CD

रोह्यात महाराजस्व समाधान शिबिर
रोहा (बातमीदार) ः तालुक्यात सर्व महसूल मंडळ विभागात आठ दिवस छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आले आहे. नियोजित दिवशी विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांनी केले आहे. या नियोजित शिबिरात चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना विशेषकरून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळवण्यासाठी लागणारे जातीचे दाखले, रहिवासी दाखले, वय व अधिवास दाखले, उत्पन्नाचे दाखले, आधार कार्ड असे आवश्यक विविध प्रकारचे दाखले प्रवेशापूर्वीच केंद्रप्रमुख व तालुका शिक्षणाधिकारी यांची सभा घेऊन ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व ग्राम पंचायत अधिकारी (ग्रामसेवक) यांच्याकडून आवश्यक पुरावे गोळा करून महसूल मंडळातील शिबिरात विद्यार्थीवर्गाला दाखले वाटप करण्यात येणार आहेत. सर्व केंद्रात हे शिबिर सकाळी ११ वाजता सुरू होणार असून, कोलाड ७ मार्च, नागोठणे १४ मार्च, चणेरा १० एप्रिल, घोसाळे १७ एप्रिल, निडीतर्फे अष्टमी १ मे तर रोहा नगरपालिका हद्दीतकरिता ८ व १५ मे रोजी होणार आहे. या शिबिराचे पालक व विद्यार्थीवर्गाने लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार किशोर देशमुख यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Hottest City in India: महाराष्ट्रातला 'हा' जिल्हा ठरला देशातला सर्वात जास्त उष्ण; उद्या मुंबईसह उत्तर कोकणात यलो अलर्ट

Iran Women Rights Restrictions : तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही ! इराणमध्ये 'या' भयानक ७ निर्बंधांमुळे नरक बनले महिलांचे जीवन

Big Boss Marathi 6 : प्रेमाची कबुली दिल्यानंतरच नात्यात दुरावा? बिग बॉस ६च्या नव्या प्रोमोने विशाल–रुचिताच्या नात्यावर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

SCROLL FOR NEXT