खालापुरात धुळवडीचा जल्लोष
खालापूर, ता. ३ (बातमीदार) ः होळी सणानिमित्ताने गटतट, पक्षीय राजकारण याला तिलांजली देत तालुक्यात ग्रामस्थांनी गावोगावी एकत्र आनंदात होळी आणि धुळवड जल्लोषात साजरा केला. पिढ्यानपिढ्या मानाची होळी, पाटलांची होळी प्रथा आजही तालुक्यात जपली जात असून परंपरा जपण्यासाठी तरुणाईचादेखील पुढाकार होता. होळी सणानिमित्ताने क्रिकेट स्पर्धांचे आयोजनदेखील अनेक ठिकाणी करण्यात आले होते. रंगांची उधळण, डीजेच्या तालावर बेधुंद तरुणाईने धुळवडीचा आनंद लुटला. कर्तव्य आणि रंग याची सांगड घालत पोलिसबांधवांनीदेखील सणाचा आनंद लुटला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.