मुंबई

नायर रुग्णालयाला गिरनार चषक

CD

नायर रुग्णालयाला गिरनार चषक; प्रथमच विजेतेपदावर कोरले नाव

मुंबई, ता. ३ : तब्बल ३२ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर नायर हॉस्पिटल संघाने प्रतिष्ठेच्या गिरनार चषक स्पर्धेत प्रथमच विजेतेपद पटकावत इतिहास रचला. यंदाच्या स्पर्धेत नायर हॉस्पिटलने प्रथम पारितोषिक जिंकत आपल्या नावाची सुवर्णाक्षरांनी नोंद केली.
गेल्या अनेक वर्षांपासून ही ट्रॉफी नायरच्या पदरी पडावी, यासाठी मोहन पवार, मुद्रस, तुकाराम राणे, रोयेकर, चंद्रशेखर गुरव, डीन मोहिते, अविनाश चाळके आदी अनुभवी खेळाडूंनी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यांचे अपूर्ण स्वप्न नव्या पिढीतील खेळाडूंनी साकार केल्याने संपूर्ण नायर परिवारात अभिमानाचे वातावरण आहे.
संघाचा कर्णधार संदीप पवार याने संघ केवळ सांभाळला नाही, तर त्याला घडवून विजेतेपदापर्यंत नेले. संघाचे प्रमुख खेळाडू अनिल कोळी, हरिकेश मेहेर, वंदेश कामनकर, मुकेश वाझा, धीरज भोईर, अमोल पाटील यांनी एकजूट आणि मेहनतीने स्पर्धेत दमदार कामगिरी केली.
वरिष्ठ खेळाडू दीपक घोडे आणि वैभव यांनी संघात स्थान नसतानाही आर्थिक व मानसिक पाठबळ देत मोलाची साथ दिली. तसेच गणपत सोगंम आणि अनिल घराडे यांनीही भक्कम पाठिंबा दिला. या यशामध्ये नायर हॉस्पिटल क्रीडा भवन, नायर जिमखाना कमिटी, अधिष्ठाता, टाइम कीपर कार्यालय आणि प्रशासकीय अधिकारी यांचेही सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले.
या ऐतिहासिक विजयामुळे नायर हॉस्पिटलच्या क्रीडा इतिहासात नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, संपूर्ण संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

Dry Fruits Price : युद्धाची झळ सुकामेव्याला! इराण-इस्रायल वादामुळे खजूर आणि बदामाचे दर वाढणार

खेळाडूंकडून ५० लाख दंड वसूल काय करताय, आणखी कठोर कारवाई करा! शाहिद आफ्रिदीने PCB ला दिला सल्ला; म्हणाला, दोन वर्षांसाठी...

Latest Marathi News Live Update : धुळे ग्रामस्थांच्या मदतीने 5 दरोडेखोर गजाआड, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Kumbh Mela : सिंहस्थात भाविकांची पायपीट थांबणार! गोदाघाटाजवळच उभारली जाणार अंतर्गत वाहनतळे

SCROLL FOR NEXT