मुंबई

श्रीवर्धनमध्ये शिमगोत्सवाला जल्लोषात प्रारंभ

CD

श्रीवर्धनमध्ये शिमगोत्सवाला जल्लोषात प्रारंभ
पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; चाकरमान्यांनी वाढवली रंगत
श्रीवर्धन, ता. ३ (बातमीदार) : तालुक्यात शिमगोत्सवाला पारंपरिक उत्साहात सुरुवात झाली असून, संपूर्ण परिसर सणाच्या रंगांनी न्हाऊन निघाला आहे. फाल्गुन पौर्णिमेपासून प्रारंभ होणारा हा सण तालुक्यातील वडवली, बोर्ली, कापोली, दांडगुरी, वेळास आदी गावांत उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबईसह बाहेरगावी रोजगारासाठी गेलेले चाकरमानी मोठ्या संख्येने परतल्याने शिमग्याची रंगत अधिक खुलली आहे.
पहिल्या दिवशी गावागावांत होळी पेटवून सणाची सुरुवात झाली. वडवली येथे श्री गावदेवीच्या पालखीची आकर्षक सजावट व दारोदारी मिरवणूक हा उत्सवाचा मुख्य भाग ठरतो. पालखी प्रत्येकाच्या घरी येत असल्याने कुटुंबीय नवे वस्त्र परिधान करून आरतीसाठी सज्ज होतात. अंगणे शेणाने सारवून त्यावर चुन्याने रांगोळ्या काढण्यात येतात. स्वच्छता, सजावट आणि भक्तिभाव यातून गावात उत्सवी वातावरण अनुभवास येते. धूलिवंदनाच्या दिवशी ही पालखी संपूर्ण गावभर फिरवली जाते. देवीसोबत ‘पोऱ्या’ म्हणून ओळखला जाणारा मानकरी सहभागी असतो. रात्री पालखी होळीच्या पटांगणातील मंडपात स्थापण्यात येते. त्यानंतर पाच दिवस विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असते. पारंपरिक नृत्य, भजने, लोककला सादरीकरणे यामुळे उत्सवाला अधिक उठाव मिळतो.

सामाजिक ऐक्याचे दर्शन
पर्यटकांचीही लक्षणीय उपस्थिती यंदा दिसून येत आहे. समुद्रकिनारा व निसर्गसौंदर्य लाभलेल्या श्रीवर्धन तालुक्यात शिमगा सणाला वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. सर्व समाजातील ग्रामस्थ एकत्र येत हा सण साजरा करत असल्याने सामाजिक ऐक्याचेही दर्शन घडते.

फोटो ओळ
श्रीवर्धन : वडवली गावात दारोदारी श्री गावदेवी पालखीची पूजा करताना महिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Yermala Crime : चोराखळी येथे कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News : तरूणपणी केला गुन्हा, म्हातारपणी झाली अटक; पोलिसांच्या जाळ्यात ३० वर्षांनतर असा अडकला फरार आरोपी

Nashik Municipal Budget : नाशिक मनपाचे ३०११ कोटींचे 'सिंहस्थ' बजेट सादर; करवाढ नाही, पण जाहिरात महागली!

Phulambri News : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT