मुंबई

जिंजी किल्ला ते शहाबाज शिवज्योत यात्रा

CD

जिंजी किल्ला ते शहाबाज शिवज्योत यात्रा
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वादळ शिवज्योत मंडळाचा उपक्रम
पोयनाड, ता. ३ (बातमीदार) : वादळ शिवज्योत मंडळ यांच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिंजी किल्ला (तमिळनाडू) ते शहाबाज (अलिबाग) अशी शिवज्योत यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यंदाचे या यात्रेचे २२ वे वर्ष आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिंजी किल्ल्यासमोर अभिवादन करून २४ फेब्रुवारी रोजी शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर सुमारे १२०० किलोमीटरच्या पायी प्रवासाला प्रारंभ झाला. ४० ते ५० शिवभक्त पाच जणांच्या गटांमध्ये दिवसरात्र ज्योत पुढे नेत आहेत. ही यात्रा तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे.
६ मार्च रोजी सकाळी १० वाजता शहाबाज गावाच्या वेशीवर शिवज्योतीचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन, मान्यवरांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pan Masala Plastic Ban : पान मसाला खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Massajog Election: मोठी बातमी! स्व. संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव; स्वरुपानंद देशमुख विजयी

Latest Marathi News Live Update : धीरेंद्र शास्त्रींच्या आव्हानावर श्याम मानव यांची प्रतिक्रिया

'झोपडपट्टीत संपूर्ण बालपण गेल्यावर…' सिद्धार्थ जाधव जुन्या आठवणी सांगताना म्हणाला... लाइट सुरू ठेवण्यासाठी आम्ही

Maharashtra Politics: मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या कारचे आमदार देवेंद्रांनी केले सारथ्य; मुख्यमंत्र्यांशी झालेली जवळीक ठरली चर्चेची!

SCROLL FOR NEXT