मुंबई

पेण शहरात श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम

CD

पेण शहरात श्रीसदस्यांची स्वच्छता मोहीम
१५ टन कचरा संकलित
प्रतिष्ठानचे कार्य म्हणजे स्वच्छता व संस्काराची चळवळ ः नगराध्यक्षा प्रीतम पाटील

पेण, ता. ३ (वार्ताहर) : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त पेण तालुक्यातील श्रीसदस्यांनी रविवारी (ता. १) शहरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्रमात सुमारे १५ टन कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
पेण, दादर, वरवणे, सापोली, हनुमान पाडा, वरसई, धावटे, वाशी, रावे, वडखळ, आंबिवली, भाल, वाशीनाका, जिते, शिर्की आदी बैठकांतील ९७० श्रीसदस्यांनी सहभाग घेतला. तहसील व प्रांताधिकारी कार्यालय, पोलिस ठाणे, फौजदारी व दिवाणी न्यायालय, बस स्थानके, उपजिल्हा रुग्णालय, रेल्वे स्थानक, वैकुंठधाम स्मशानभूमी तसेच विविध प्रमुख रस्ते व परिसर स्वच्छ करण्यात आले. अंतर्गत २१ कि.मी. रस्त्यांवरून ४.३५५ टन ओला व ११.२०० टन सुका कचरा संकलित करून शहराबाहेरील डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्यात आली. हे कार्य म्हणजे स्वच्छता आणि संस्कारांची चळवळ असल्याचे नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Yermala Crime : चोराखळी येथे कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News : तरूणपणी केला गुन्हा, म्हातारपणी झाली अटक; पोलिसांच्या जाळ्यात ३० वर्षांनतर असा अडकला फरार आरोपी

Nashik Municipal Budget : नाशिक मनपाचे ३०११ कोटींचे 'सिंहस्थ' बजेट सादर; करवाढ नाही, पण जाहिरात महागली!

Phulambri News : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT