श्रीसदस्यांची व्यापक स्वच्छता मोहीम
साडेअकरा किलोमीटर रस्ता चकाचक
शासकीय कार्यालये व स्मशानभूमी परिसरातही स्वच्छता
खालापूर, ता. १ (बातमीदार) : डॉ. श्री नारायण विष्णू धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा अंतर्गत रविवारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कचरा संकलित करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही मोहीम व्यापक स्तरावर पार पडली. विशेष म्हणजे, देशासह परदेशातील समर्थ बैठकींमध्येही हा उपक्रम राबविण्यात आला.
सकाळी ८ वाजल्यापासून हजारो श्रीसदस्य झाडू, घमेल, फावडे, कोयते आदी साहित्यांसह सफाईत सहभागी झाले. तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी तसेच खोपोली शहरातील शासकीय कार्यालये व बसस्थानक परिसर स्वच्छ करण्यात आला.
या मोहिमेत १,५५३ सदस्यांनी सहभाग घेत २,६०० किलो ओला व १८,९७५ किलो सुका कचरा जमा केला. तालुक्यातील साडेअकरा किलोमीटर रस्ता व ५३,७८६ चौरस मीटर शासकीय परिसर स्वच्छ करण्यात आला. नगर पंचायत व नगर परिषद प्रशासनाचे सहकार्य लाभले.
**फोटो-स्वच्छता मोहिमेत सहभागी श्रीसदस्य आणि पोलिस कर्मचारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.