मुंबई

नालासोपारात मँग्रोव्ह पार्क उभारणार

CD

नालासोपाऱ्यात मँग्रोव्ह पार्क उभारणार
आमदार राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची पाहणी

विरार, ता. ३ (बातमीदार) : वसई-विरार शहराच्या पर्यटन विकासात मानाचा तुरा ठरणारे सुमारे १०० कोटी रुपयांचे कांदळवन (मँग्रोव्ह) पार्क नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील मारंबळपाडा खाडी परिसरात उभारण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे सहा एकर जागेवर हे प्रशस्त मँग्रोव्ह पार्क उभारण्याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
कांदळवनांच्या विविध प्रजातींचे संवर्धन, नागरिकांना पर्यावरणविषयक माहिती तसेच पर्यटनाच्या दृष्टीने वसई-विरारचा विकास व्हावा, या उद्देशाने आमदार राजन नाईक यांनी मँग्रोव्ह पार्कची मागणी केली होती. त्यानंतर मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. या बैठकीत मँग्रोव्ह पार्क उभारणीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सोमवारी (ता. २) झालेल्या पाहणी दौऱ्यात कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कोकण विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक ज्ञानेश्वर राक्षे, वन परिक्षेत्र अधिकारी प्रतीक मोडवान, वसई उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, तहसीलदार दीपक गायकवाड, वनपाल अंगद दत्तनुरे आदी अधिकारी उपस्थित होते. या वेळी विरोधी पक्षनेते मनोज पाटील, जिल्हा महामंत्री मनोज बारोट, गटनेते अशोक शेळके, नगरसेवक जितेंद्र पाटील, जयप्रकाश वझे, संजोग यंदे, शहराध्यक्ष विशाल राऊत तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विरारजवळील मारंबळपाडा येथील नवीन जेट्टी व जुनी जेट्टीदरम्यान हे मँग्रोव्ह पार्क उभारण्यात येणार असून, समुद्री जीवसृष्टीच्या अभ्यासासाठी ओपन डेकही उभारण्यात येणार आहे. तसेच आगामी काळात विरार पूर्व येथे बर्ड पार्क, महापालिकेच्या आरक्षित जागांवर सुशोभित उद्याने आणि खेळांसाठी मैदाने विकसित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजन नाईक यांनी दिली. या प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच पर्यटनवाढीला चालना मिळून वसई-विरारच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत लग्नाचं आमिष; पुण्यातील महिलेकडून ४२ लाख रुपये उकळले...

IND vs ENG, Semi: भारताने इंग्लंडविरुद्ध कोणती Playing XI खेळवावी? रवी शास्त्री, रिकी पाँटिंग यांचा सल्ला; म्हणाले, अभिषेकला तर...

विकी कौशल चिमुकलीच्या चक्क पडला पाया! स्टेजवरचा तो क्षण पाहून सगळेच झाले भावूक, Viral Video

Navi Mumbai: नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १८.६३ कोटींचे अमली पदार्थ भस्मसात

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

SCROLL FOR NEXT