मुंबई

शाळांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांची बैठक घेणार

CD

स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांची बैठक घेणार; महापौर अजीव पाटील यांचे आश्वासन

विरार, ता. ३ (बातमीदार) : स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत स्वयंअर्थसहाय्यित शाळा समूह संघटनेच्या प्रतिनिधींनी वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात महापौर अजीव पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी महापौर अजीव पाटील यांनी शिष्टमंडळाला आश्वासन देताना सांगितले की, स्वयंअर्थसहाय्यित शाळा या शहराच्या शैक्षणिक व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी त्यांना प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल. संघटनेने मांडलेल्या समस्यांवर नियोजनपूर्वक तोडगा काढण्यासाठी लवकरच संबंधित शासकीय विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत संघटनेच्या प्रतिनिधींनी स्वयंअर्थसहाय्यित शाळांसमोरील आर्थिक, प्रशासकीय आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अडचणी मांडल्या. शासनामार्फत आकारण्यात येणारे विविध कर, परवाने, नाहरकत दाखले यामध्ये सवलत देण्याची मागणी करण्यात आली. तसेच विविध शासकीय उपक्रमांसाठी ऐनवेळी शाळांचे वर्गखोल्या व मैदाने विनामूल्य उपलब्ध करून देण्याबाबत मर्यादा निश्चित कराव्यात, मोठ्या प्रमाणावर शिक्षकवर्गाची नियुक्ती टाळावी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातील प्रश्न सोडवावेत आणि नुकत्याच झालेल्या श्वान गणनेचे काम शिक्षकांना देऊ नये, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. या सकारात्मक भूमिकेमुळे स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या समस्या मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Crime : बारामती तालुका पोलिसांनी प्रेमी युगुलाला लुटणा-या तिघांना काही तासात केले गजाआड....

Mathura Holika Dahan: जळत्या होळीमध्ये चालतो माणूस; मथुरेतील 'या परंपरेमागचं रहस्य काय? ४५ दिवसही करतो अन्नत्याग

ISRO मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत लग्नाचं आमिष; पुण्यातील महिलेकडून ४२ लाख रुपये उकळले...

IND vs ENG, Semi: भारताने इंग्लंडविरुद्ध कोणती Playing XI खेळवावी? रवी शास्त्री, रिकी पाँटिंग यांचा सल्ला; म्हणाले, अभिषेकला तर...

विकी कौशल चिमुकलीच्या चक्क पडला पाया! स्टेजवरचा तो क्षण पाहून सगळेच झाले भावूक, Viral Video

SCROLL FOR NEXT