डॉ. श्रद्धा वेखंडे यांना पीएचडी
वाडा, ता. ३ (बातमीदार) : वाडा तालुक्यातील कळंभोली येथील डॉ. श्रद्धा विठ्ठल वेखंडे यांनी भारतातील अग्रगण्य तांत्रिक शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी मुंबई येथून कृषीतील ‘मृदा आरोग्य’ या विषयात पीएचडी तसेच एमटेक पदवी संपादन करीत उल्लेखनीय शैक्षणिक यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वांकडून अभिनंदन होत आहे.
डॉ. श्रद्धा यांचे शालेय शिक्षण गोपाळ गार्डन हायस्कूल, बोरिवली येथे झाले. ज्ञान व संस्कारांची भक्कम पायाभरणी या शाळेत झाल्यामुळे त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासाला योग्य दिशा मिळाली, असे त्यांचे वडील विठ्ठल वेखंडे यांनी सांगितले. यानंतर त्यांनी वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय), मुंबई येथून सिव्हिल अभियांत्रिकी शाखेत बीटेक पदवी पूर्ण केली. अभियांत्रिकी शिक्षणानंतर समाजातील प्रश्नांवर काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी उच्च शिक्षणाचा मार्ग निवडला आणि मृदा आरोग्य विषयात संशोधन करीत एमटेक व पीएचडी पदवी संपादन केली.
डॉ. श्रद्धा यांच्या मते, माती ही केवळ शेतीची जमीन नसून अन्नसुरक्षा, पर्यावरण संतुलन आणि समाजाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मातीचे आरोग्य, पिकांची गुणवत्ता आणि मानवी आरोग्य यांचा घनिष्ठ संबंध असल्याने या विषयातील वैज्ञानिक संशोधन प्रत्यक्ष शेतीच्या वास्तवाशी जोडणे आणि ते ज्ञान शेतकरी व समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी व्हावा हीच पुढील कार्याची दिशा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
साध्या कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचला असून, अनेक विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.