एच. टी. पारेख फाउंडेशनतर्फे ‘हर्षा पारेख लायब्रेरियन पुरस्कार’चे आयोजन
मुंबई, ता. ३ : संपूर्ण भारतातील मुलांसोबत काम करणाऱ्या ग्रंथपालांचा सन्मान करण्यासाठी मुंबईस्थित धर्मादाय संस्था एच. टी. पारेख फाउंडेशन (एचटीपीएफ) तर्फे नुकताच नेहरू सेंटर येथील ‘हॉल ऑफ हार्मनी’मध्ये पहिल्या ‘हर्षा पारेख लायब्रेरियन पुरस्कारा’चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील हा कार्यक्रम मुलांमध्ये कुतूहल, कल्पनाशक्ती आणि वाचनाची आवड वाढवणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यासाठी प्रथमच आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास दीपक एस. पारेख (अध्यक्ष, एच. टी. पारेख फाउंडेशन व माजी अध्यक्ष, एचडीएफसी लिमिटेड), अनंत गोयंका (कार्यकारी संचालक, द इंडियन एक्स्प्रेस ग्रुप), तारा शर्मा सलुजा (अभिनेत्री व निर्माता), अश्विन संघी तसेच स्वर्गीय हर्षा एस. पारेख यांच्या कुटुंबीयांसह अनेक मान्यवर आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या महत्त्वाबद्दल बोलताना फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक व सीईओ झिया लालकाका यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांतील विविध संस्थांसोबतच्या कामातून मुलांमध्ये वाचनाची सवय रुजवण्यासाठी आणि पुस्तकांशी आयुष्यभराचे नाते निर्माण करण्यासाठी ग्रंथपालांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे प्रकर्षाने जाणवले आहे. ‘हर्षा पारेख लायब्रेरियन पुरस्कारा’ची पहिली आवृत्ती शांतपणे बदल घडवून आणणाऱ्या ग्रंथपालांचा औपचारिक सन्मान करून या वचनबद्धतेला पुढे नेणारी आहे. भविष्यात हा पुरस्कार दरवर्षी आयोजित करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.