मुंबई

काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा वालधुनी नदी पाहणी दौरा

CD

वालधुनी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी काँग्रेस आक्रमक
जिल्हाध्यक्ष डॉ. राजकुमार पातकर यांचा पाहणी दौरा

कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : वालधुनी नदीतील वाढते प्रदूषण, साचलेला गाळ आणि दरवर्षी उद्भवणारी पूरस्थिती या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष डॉ. राजकुमार पातकर यांनी नदी परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. ‘वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थे’ने मांडलेल्या समस्यांची दखल घेत त्यांनी संबंधित विभागाकडे तातडीने निवेदन सादर केले असून, नदीच्या कायमस्वरूपी स्वच्छतेची मागणी केली आहे.

संस्थेचे अध्यक्ष सुनील उतेकर यांनी डॉ. पातकर यांना नदीच्या सद्यःस्थितीची सविस्तर माहिती दिली. भवानीनगर, अनुपम नगर, घोलप नगर, योगिता, त्रिमूर्ती कॉलनी, बंदर पाडा, मोना रोड, मिलिंद नगर आणि छत्रपती शिवाजी महाराज नगर यांसारखे भाग नदीपात्रालगत असल्याने पावसाळ्यात येथे भीषण परिस्थिती निर्माण होते. जुलै महिन्यात पूर आल्यावर घरांमध्ये पाच ते सात फूट पाणी शिरते, ज्यामुळे नागरिकांना स्थलांतर करावे लागते. पूर ओसरल्यानंतरही सरकारी यंत्रणेला साफसफाईसाठी दोन-दोन दिवस प्रतीक्षा करावी लागते, असा संताप स्थानिकांनी व्यक्त केला.

स्थानिक नागरिकांनी या वेळी आपली ठाम भूमिका मांडली. ‘‘आम्हाला केवळ पुराच्या वेळी मिळणारी तात्पुरती मदत नको आहे. प्रशासनाने वालधुनी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण आणि प्रदूषणमुक्ती करून तिचे सुशोभीकरण करावे. या नदीला एका पर्यटनस्थळाच्या रूपात विकसित करावे,’’ अशी मागणी रहिवाशांनी केली.

काँग्रेसचा खंबीर पाठिंबा
नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यावर डॉ. राजकुमार पातकर यांनी संस्थेला आणि स्थानिकांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. वालधुनी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. गाळ काढणे, प्रदूषण रोखणे आणि सुशोभीकरण या कामांसाठी प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असा विश्वास डॉ. पातकर यांनी या वेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hottest City in India: महाराष्ट्रातला 'हा' जिल्हा ठरला देशातला सर्वात जास्त उष्ण; उद्या मुंबईसह उत्तर कोकणात यलो अलर्ट

Iran Women Rights Restrictions : तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही ! इराणमध्ये 'या' भयानक ७ निर्बंधांमुळे नरक बनले महिलांचे जीवन

Big Boss Marathi 6 : प्रेमाची कबुली दिल्यानंतरच नात्यात दुरावा? बिग बॉस ६च्या नव्या प्रोमोने विशाल–रुचिताच्या नात्यावर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

Nasrapur Crime : कापुरव्होळ येथील उद्योजकाच्या मुलाचे अपहरण; सिनेस्टार्ईल नाकाबंदीने एक तासात मुलगा ताब्यात, अपहरणकर्ते मात्र फरार

SCROLL FOR NEXT