मुंबई

बिर्ला कॉलेजमध्ये नवीन लेखकांचे शिबिर

CD

बिर्ला महाविद्यालयात हिंदी लेखकांसाठी राष्ट्रीय शिबिर
नऊ राज्यांतील ७० उदयोन्मुख लेखकांचा सहभाग

कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : बी. के. बिर्ला महाविद्यालय आणि दिल्लीतील केंद्रीय हिंदी निदेशालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदीतर भाषिक नवलेखक शिबिराचा सहा दिवसांचा सोहळा उत्साहात पार पडला. देशातील नऊ राज्यांतील ७० तरुण लेखकांनी या शिबिरात सहभागी होऊन साहित्याच्या विविध पैलूंचे धडे गिरवले.

समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. अवधेश शुक्ला उपस्थित होते. मध्ययुगीन कवींच्या लेखन प्रक्रियेवर भाष्य करताना त्यांनी नवलेखकांना सकस साहित्यातून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला. विशेष अतिथी मुंबई विद्यापीठातील डीएलएलईचे संचालक डॉ. बळीराम गायकवाड यांनी लेखनाच्या बदलत्या आयामांची ओळख करून दिली आणि अशा राष्ट्रीय कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले.
सहा दिवस चाललेल्या या शिबिरात दिग्गज साहित्यिकांनी नवोदितांना मार्गदर्शन केले. शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र यांनी साहित्य हे समाजाचे मार्गदर्शक आहे. लेखकांनी जागरूक राहून लेखन करावे, असे म्हटले. दिल्लीतील सहाय्यक संचालक रत्नेश कुमार मिश्रा यांनी लेखकांना सर्वप्रथम चांगले वाचक होण्याचे आवाहन केले. डॉ. सतीश पांडे आणि प्रा. राजेंद्र गौतम यांनी अनुक्रमे गद्यलेखन आणि कविता कलेतील बारकाव्यांवर सविस्तर चर्चा केली. प्रमुख मार्गदर्शक डॉ. दामोदर खडसे, डॉ. मधु कांकरिया, डॉ. हुबनाथ पांडे, डॉ. सत्यदेव त्रिपाठी आणि ज्येष्ठ पत्रकार नवीन पांडे यांनीही आपले अनुभव मांडले.

देशभरातून प्रतिनिधींचा सहभाग
या शिबिरात आसाम, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील ७० प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. प्राचार्या डॉ. अविनाश पाटील यांनी केंद्रीय हिंदी निदेशालयाचे आभार मानले, तर शिबिराचे समन्वयक प्रा. श्यामसुंदर पांडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य डॉ. हरीश दुबे, डॉ. महादेव यादव, डॉ. बालकवी सुरंजे, डॉ. प्रतिभा गाढे, डॉ. सीताराम म्हस्के आणि हिंदी विभागातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Hottest City in India: महाराष्ट्रातला 'हा' जिल्हा ठरला देशातला सर्वात जास्त उष्ण; उद्या मुंबईसह उत्तर कोकणात यलो अलर्ट

Iran Women Rights Restrictions : तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही ! इराणमध्ये 'या' भयानक ७ निर्बंधांमुळे नरक बनले महिलांचे जीवन

Big Boss Marathi 6 : प्रेमाची कबुली दिल्यानंतरच नात्यात दुरावा? बिग बॉस ६च्या नव्या प्रोमोने विशाल–रुचिताच्या नात्यावर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

SCROLL FOR NEXT