मुंबई

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन

CD

राष्ट्रीय विज्ञानदिनाचे आयोजन

पालघर, ता. ३ (बातमीदार) : एस. के. पाटील विद्यामंदिर, माकुणसार येथे शनिवारी (ता. २८) राष्ट्रीय विज्ञानदिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञानदिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेतील शिक्षक सुरेश कोळेकर यांनी या दिनाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, राष्ट्रीय विज्ञानदिन हा नोबेल पुरस्कार विजेते आशिया खंडातील पहिले भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी. व्ही. रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रसिद्ध केलेल्या रामन इफेक्ट या प्रकाश किरणांच्या प्रयोगाबद्दल त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासह समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी देशभरात आयोजित केला जातो. आज आपल्या जीवनात विज्ञानाचा मोठा वापर होत असून, आपण विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली असल्याचे सांगताना विद्यार्थ्यांनी बदलत्या प्रवाहाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, असेही ते म्हणाले. तसेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. शाळेतील विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दोन नाटिका सादर करून त्यातून २०१३ पासून राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आला असल्याचे सांगून कायद्याची वैशिष्ट्ये ही सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग पाटील यांनी केले. या वेळी शाळेतील मुख्याध्यापक अशोक गोलवड यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hottest City in India: महाराष्ट्रातला 'हा' जिल्हा ठरला देशातला सर्वात जास्त उष्ण; उद्या मुंबईसह उत्तर कोकणात यलो अलर्ट

Iran Women Rights Restrictions : तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही ! इराणमध्ये 'या' भयानक ७ निर्बंधांमुळे नरक बनले महिलांचे जीवन

Big Boss Marathi 6 : प्रेमाची कबुली दिल्यानंतरच नात्यात दुरावा? बिग बॉस ६च्या नव्या प्रोमोने विशाल–रुचिताच्या नात्यावर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

Nasrapur Crime : कापुरव्होळ येथील उद्योजकाच्या मुलाचे अपहरण; सिनेस्टार्ईल नाकाबंदीने एक तासात मुलगा ताब्यात, अपहरणकर्ते मात्र फरार

SCROLL FOR NEXT