मुंबई

''डिजिटल अरेस्ट ''च्या नावाखाली ठाण्यात निवृत्त सरकारी अधिकाऱ्याची फसवणूक

CD

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने फसवणूक
ठाण्यात निवृत्त अधिकाऱ्याला ४९ लाखांचा गंडा
ठाणे, ता. ३ ः सायबर भामट्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ठाण्यातील एका ६२ वर्षीय निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला तब्बल ४९ लाख सात हजार रुपयांचा गंडा घातला आहे. पाच दिवस स्वतःच्याच घरात ओलीस राहिलेल्या या पित्याची फसवणूक होत असल्याचे अमेरिकेत असलेल्या मुलीने लक्षात आणून दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

कोपरी परिसरात राहणारे तक्रारदार हे पाटबंधारे विभागातून निवृत्त झाले आहेत. १२ फेब्रुवारी रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख ‘ट्राय’ अधिकारी विजय जसवंत अशी करून दिली. ‘तुमच्या आधार कार्डचा वापर करून मनी लाँड्रिंग झाले आहे,’ अशी भीती त्याने घातली. तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी भामट्याने त्यांचे नाव जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्या ५३८ कोटींच्या घोटाळ्यात असल्याचे सांगितले. सीबीआय आणि मुंबई क्राईम ब्रांचचे बनावट अधिकारी, तसेच चक्क ‘न्यायाधीशां’शी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद घडवून आणला. तक्रारदारांना घराबाहेर जाण्यास बंदी घातली. इतकेच नव्हे, तर १७ फेब्रुवारीला रुग्णालयात जाण्यासाठीही त्यांनी या भामट्यांची परवानगी घेतली होती.

जमापुंजीवर डल्ला
‘आरबीआय स्क्रूटनी’ आणि चौकशीतून नाव काढण्याच्या बहाण्याने आरोपींनी तक्रारदाराला त्यांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड विकण्यास भाग पाडले. अशा प्रकारे एकूण ४९ लाख सात हजार रुपये विविध बँक खात्यांत जमा करून घेतले.

मुलीच्या सतर्कतेमुळे उलगडा
हा सर्व प्रकार तक्रारदाराने अमेरिकेत असलेल्या आपल्या मुलीला सांगितला. तिने हे ‘डिजिटल अरेस्ट’चे नवीन सायबर फसवणुकीचे तंत्र असल्याचे पित्याच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर त्यांनी तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधला. याप्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक प्रदीप केरकर पुढील तपास करीत आहेत. सुशिक्षित आणि ज्येष्ठ नागरिकांनी अशा प्रकारच्या धमक्यांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hottest City in India: महाराष्ट्रातला 'हा' जिल्हा ठरला देशातला सर्वात जास्त उष्ण; उद्या मुंबईसह उत्तर कोकणात यलो अलर्ट

Iran Women Rights Restrictions : तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही ! इराणमध्ये 'या' भयानक ७ निर्बंधांमुळे नरक बनले महिलांचे जीवन

Big Boss Marathi 6 : प्रेमाची कबुली दिल्यानंतरच नात्यात दुरावा? बिग बॉस ६च्या नव्या प्रोमोने विशाल–रुचिताच्या नात्यावर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

Nasrapur Crime : कापुरव्होळ येथील उद्योजकाच्या मुलाचे अपहरण; सिनेस्टार्ईल नाकाबंदीने एक तासात मुलगा ताब्यात, अपहरणकर्ते मात्र फरार

SCROLL FOR NEXT