विद्यार्थ्यांनी भरवला आठवडा बाजार
४० हजारांची उलाढाल
रोहा, ता. ३ (बातमीदार) : रोहा येथील राजिप तळघर शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी भरवलेला आठवडा बाजार उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार, बाजारमूल्य आणि दैनंदिन खरेदी-विक्रीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
मुख्याध्यापक विलास सुटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक पल्लवी गायकर, निकिता धूपकर, आकांक्षा मेहतर तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल्स उभारले. बाजारात गावठी भाज्या, फळे, फुले, कडधान्ये, वाल-मटकी, शेंगा आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंची आकर्षक मांडणी करण्यात आली होती.
ग्राहकांशी संवाद, पैशांचे नियोजन आणि विक्री व्यवस्थापन याचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला. ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत खरेदी केली. या उपक्रमातून सुमारे ३५ ते ४० हजार रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश कांबळे यांनी दिली.
फोटो कॅप्शन : आठवडा बाजारनिमित्ताने जमलेले विद्यार्थी व नागरिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.