मुंबई

मालमत्ता करवसुली मोहिमेत अडथळा

CD

उल्हासनगर, ता. ४ (बातमीदार) : मालमत्ता करवसुलीला वेग देण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने कंबर कसली आहे. पालिकेने थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याची मोहीम हाती घेतली असताना आता कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
महापालिकेने यंदा १५० कोटी रुपयांच्या करवसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. मागील आर्थिक वर्षात कर निर्धारक व संकलक नीलम कदम यांनी १२६ कोटी ५६ लाख रुपयांची विक्रमी वसुली केली होती. हेच वसुलीचे ध्येय समोर ठेवून आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी त्यांची पुनर्नियुक्ती करून मोहिमेला गती दिली आहे.
मार्च अखेरपर्यंतचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आयुक्त आव्हाळे यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस आणि उपायुक्त विशाखा मोटघरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभागाने बड्या थकबाकीदारांविरोधात मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे ७२ कोटी रुपयांची वसुली झाली असून १८ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.
कॅम्प ५ परिसरातील स्वामी शांती प्रकाश आश्रमजवळील सतनाम सखी अपार्टमेंट सोसायटीकडे ४६ लाख रुपयांची थकबाकी होती. सोमवारी (ता. २) कारवाईदरम्यान संबंधित व्यक्तीने पथकाला विरोध करत अडथळा निर्माण केल्याची माहिती आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा हिललाइन पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी यास दुजोरा दिला. दरम्यान, संबंधित सोसायटीची मालमत्ता सील करण्यात आली असून, उर्वरित थकबाकीदारांविरुद्धही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती कर निर्धारक व संकलक नीलम कदम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

Safe Investment : अमेरिका–इराण युद्धाने शेअर बाजार हादरला! घाबरू नका… या 6 गुंतवणुकीत तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Latest Marathi News Live Update : राज्यसभेबाबतचा निर्णय संध्याकाळपर्यंत घेतला जाईल- संजय राऊत

Budget 2026: यंदा राज्य सरकारची कसरत! तूट, कर्जामुळे योजना व विकासाचा समतोल साधण्याचे आव्हान

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपाचा शेअर बाजारात डंका! २०० कोटींच्या 'ग्रीन बॉण्ड'ला ५४० कोटींचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT