‘डबल डेकर’ कॉरिडॉर धावणार मेट्रो
कल्याण ते ठाणे प्रवास आता सुसाट
कल्याण, ता. ४ (वार्ताहर) : कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आता ‘डबल डेकर’ (त्रिस्तरीय) वाहतूक मॉडेल राबवण्यात येणार आहे. यामध्ये सर्वात खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि सर्वात वरच्या स्तरावर मेट्रो, असा आधुनिक पायाभूत सुविधांचा नकाशा तयार करण्यात आला आहे.
सोमवारी एमएमआरडीए मुख्यालयात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. या योजनेमुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमधील प्रवाशांचा मुंबई-ठाण्यापर्यंतचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद होणार आहे.
वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी शिळफाटा ते रांजणोली दरम्यान द्विस्तरीय रस्ता उभारण्याचे नियोजन असून, त्याच्या निविदा प्रक्रिया जलद गतीने राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कल्याण (पूर्व) यू-टाइप रस्ता आणि श्रीमलंग रस्त्यासाठी बाधित होणाऱ्या नागरिकांना ‘क्लस्टर’ योजनेद्वारे हक्काची घरे आणि व्यावसायिकांना गाळे देण्यात येणार आहेत. काटई नाका येथील बोगद्याचे काम आणि टप्पा ३ चे भूसंपादन युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्तांना दिल्या आहेत.
विस्तारित मेट्रो जाळे
मेट्रो ५ चे ‘५-ब’ (चिखलोली ते बदलापूर) आणि ‘५-क’ (दुर्गाडी ते टिटवाळा) अशा दोन टप्प्यांत विस्तारीकरण होणार आहे. तसेच मेट्रो १२ चे ‘१२-ब’ (शिळफाटा-मुंब्रा-कळवा ते ठाणे) हे नवीन मार्गिका प्रस्तावित करण्यात आली आहे.
त्रिस्तरीय वाहतूक व्यवस्था
कल्याण-तळोजा (मेट्रो १२), कांजूरमार्ग-बदलापूर (मेट्रो १४) आणि ठाणे-भिवंडी-कल्याण (मेट्रो ५) या सर्व मार्गिका आता डबल डेकर पद्धतीने उभारल्या जातील.
कल्याण लोकसभेतील या प्रकल्पांमुळे केवळ वाहतूक कोंडी फुटणार नाही, तर या परिसराच्या विकासाला एक नवा आयाम प्राप्त होईल.
- डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.