मुंबई

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे राज्यभर टप्प्याटप्प्याने आंदोलन

CD

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे राज्यभर टप्प्याटप्प्याने आंदोलन

कासा, ता. ३ (बातमीदार) : राज्यातील पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटना यांनी प्रशासनाच्या धोरणांविरोधात राज्यभर टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
संघटनेच्या मते, ग्रामीण भागात पशुवैद्यकीय अधिकारी २४ तास आपत्कालीन सेवा देत असतात. कोरोना काळात लॉकडाऊनच्या परिस्थितीत प्रवास करून लसीकरण, उपचार, प्रसूती तसेच दुग्धव्यवसाय सुरळीत ठेवण्याचे काम त्यांनी केले. बर्ड फ्लूच्या साथीवेळी राज्याने तयार केलेली कार्यपद्धती (एसओपी) केंद्र शासनाने स्वीकारून देशभर लागू केली होती. नवापूर येथे कमी कालावधीत साथ नियंत्रणात आणण्यात यश आल्याचा दावा संघटनेने केला आहे. तसेच लंपी रोगाच्या काळातही शेतकऱ्यांच्या दारोदारी जाऊन मोफत सेवा देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
तथापि, प्रत्यक्ष तांत्रिक कामाऐवजी ऑनलाइन नोंदी, पोर्टल डेटा एन्ट्री आणि अहवाल सादरीकरण यासारख्या लिपिकीय कामांचा अतिरेक होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. मनुष्यबळ अपुरे असताना दवाखान्यांच्या वेळा वाढविणे, बायोमेट्रिक उपस्थितीची सक्ती आणि २४ तास उपलब्धतेची अपेक्षा यामुळे अधिकारी दररोज १२ ते १६ तास काम करत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. परिणामी शेतकरी व पशुपालकांना वेळेवर सेवा देण्यात अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
संघटनेने सोमवार (ता. २) पासून आंदोलनाची सुरुवात केली असून, काळ्या फिती लावून काम करणे, सामूहिक रजा, अहवाल सादर करणे बंद ठेवणे आणि एकदिवसीय उपोषण अशा टप्प्यांत आंदोलन करण्यात येत आहे. १० मार्चपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास सामूहिक राजीनाम्याचा इशाराही देण्यात आला आहे. पालघर शाखेचे प्रतिनिधी डॉ. राहुल संखे यांनी शासनाने आवश्यक मनुष्यबळ व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. या आंदोलनामुळे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hottest City in India: महाराष्ट्रातला 'हा' जिल्हा ठरला देशातला सर्वात जास्त उष्ण; उद्या मुंबईसह उत्तर कोकणात यलो अलर्ट

Iran Women Rights Restrictions : तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही ! इराणमध्ये 'या' भयानक ७ निर्बंधांमुळे नरक बनले महिलांचे जीवन

Big Boss Marathi 6 : प्रेमाची कबुली दिल्यानंतरच नात्यात दुरावा? बिग बॉस ६च्या नव्या प्रोमोने विशाल–रुचिताच्या नात्यावर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

Nasrapur Crime : कापुरव्होळ येथील उद्योजकाच्या मुलाचे अपहरण; सिनेस्टार्ईल नाकाबंदीने एक तासात मुलगा ताब्यात, अपहरणकर्ते मात्र फरार

SCROLL FOR NEXT