युद्धजन्य परिस्थितीमुळे कृषी निर्यात ठप्प
जेएनपीए बंदरात १,५०० ते दोन हजार कंटेनर अडकले
उरण, ता. ३ (वार्ताहर) : आखाती देशांतील वाढत्या युद्धजन्य तणावाचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीवर झाला आहे. जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीए) येथे सुमारे १,५०० ते दोन हजार कंटेनर अडकून पडले असून, कांदा, द्राक्षे आणि केळी यांसारख्या नाशवंत मालाच्या निर्यातीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
आखाती देशांतील वाढत्या युद्धजन्य तणावाचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीवर होताना दिसत आहे. जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीए) येथे सध्या सुमारे १,५०० ते दोन हजार ‘रिफर’ कंटेनर अडकून पडले असून, त्यामध्ये कांदा, द्राक्षे आणि केळी यांसारख्या नाशवंत कृषी मालाचा समावेश आहे. व्यापारी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशांकडे जाणाऱ्या सागरी मार्गांवर असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याने अनेक शिपिंग कंपन्यांनी माल स्वीकारण्यास नकार दिला आहे. अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे काही जहाजांची वेळापत्रके रद्द करण्यात आली आहेत, तर काही जहाजांना माघारी फिरण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.
--------------
महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात निर्यात
जेएनपीए बंदरातून प्रामुख्याने इराक, सौदी अरेबिया, कतार आदी देशांमध्ये कृषी मालाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. विशेषतः महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, अहमदनगर, जळगाव परिसरातून द्राक्षे व केळी, तर कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात आखाती बाजारपेठेत होते.
--------------
कृषी व्यापाराला दीर्घकालीन फटका
या परिस्थितीचा कृषी निर्यात क्षेत्रावर ६० ते ७० टक्क्यांपर्यंत परिणाम झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. माल वेळेत पोहोचला नाही, तर गुणवत्ता घसरण्याची भीती आहे. वाढते रिफर कंटेनर भाडे, वीज खर्च आणि करार रद्द होण्याचा धोका यामुळे निर्यातदारांवर आर्थिक ताण वाढला आहे. परिस्थिती लवकर सुरळीत न झाल्यास कृषी व्यापाराला दीर्घकालीन फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.