अंबरनाथ, ता. ५ (वार्ताहर) : अंबरनाथ व बदलापूर परिसरातील वाढत्या रेल्वे प्रवासी संख्येमुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) रजनीश गोयल यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. संयुक्त भारत पक्षाने जाहीर केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती.
बैठकीत चिखलोली रेल्वे स्थानकाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. हे स्थानक कार्यान्वित झाल्यास बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा मुद्दा मांडण्यात आला. बदलापूर स्थानकात फलाटावर पडून मृत्यू पावलेल्या चेतना अक्षय देवरुखकर आणि बारावीतील विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून तातडीने आर्थिक मदत देण्याबाबतही चर्चा झाली.
पावसाळ्यापूर्वी रेल्वे मार्गिका ५ व ६ चे काम पूर्ण करणे, फलाटांची लांबी वाढवणे, शेड उभारणे, स्वच्छतागृहे व पाणपोई सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच बॅरिकेटिंगची कामे पूर्ण करण्याच्या मागण्या करण्यात आल्या. प्रवाशांची होणारी कोंडी टाळण्यासाठी रेल्वे सेवा वेळेत सुरू ठेवणे, १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणे आणि स्थानक परिसरात अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा वाढवण्यावरही भर देण्यात आला. याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी बसवलेले स्वयंचलित जिने २४ तास सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली. या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे आश्वासन विभागीय व्यवस्थापकांनी दिले.
बैठकीला आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, बदलापूर शिवसेना शहरप्रमुख व माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, नगरसेवक संजय भोईर, संयुक्त भारत पक्षाचे पदाधिकारी, उपोषणकर्ते आणि रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.