ठाण्यात धुळवडीचा रंग पोलिसांनी उतरवला
१९६ मद्यपी चालक तावडीत; १,६८१ जणांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : होळी आणि धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील पाच परिमंडळात वाहतूक नियम धाब्यावर बसविणाऱ्या एक हजार ६८१ जणांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने कारवाई केली, तर नाकाबंदीत १९६ मद्यपी चालकांसह विनाहेल्मेट ८३६, अधिक प्रवासी २२७, विरुद्ध दिशेने येणारे १४ आणि ४०८ ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
ठाणे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार, होळी व धुळवडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात वाहतूक विभागातील ४५० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नाकाबंदीसाठी तैनात केले होते. होळी- धूलिवंदन कालावधीत मद्यप्राशन करून किंवा नशा करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची व्यूहरचना वाहतूक विभागाने केली होती. या नाकाबंदीत नशापान किंवा मद्यप्राशन करून दुचाकी, चारचाकी वाहने चालविणाऱ्या तब्बल १९६ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला, तर ८३६ विनाहेल्मेट दुचाकी चालवणारे, ४०८ ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रिक्षामध्ये अधिक प्रवासी घेणाऱ्या २२७ चालकांवर कारवाई केली असून, विरुद्ध दिशेने वाहन दामटविणारे १४ वाहनचालक तावडीत सापडले आहेत. अशा एकूण एक हजार ६८१ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्या धुळवडीचा रंग पोलिसांनी उतरवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.