मुंबई

एमडी पावडरसह एकाला अटक

CD

४१ लाखांच्या ‘एमडी’सह राजस्थानचा तरुण जेरबंद
ओवळा नाका परिसरात सापळा रचून कारवाई
ठाणे, ता. ४ : घोडबंदर रोडवर अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. राजेशकुमार मगनाराम (३०, रा. राजस्थान) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ४१ लाख ७४ हजार रुपये किमतीचा ‘मेफेड्रॉन’ (एमडी) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

ओवळा नाका येथील ‘सागर लॉजिंग अँड बोर्डिंग’ परिसरात मंगळवारी (ता. ३) सकाळी एक तरुण अमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ कर्णवर-पाटील आणि उपनिरीक्षक दीपक डुम्मलवाड यांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या राजेशकुमारला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे अमली पदार्थांचे घबाड सापडले. राजेशकुमार विरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अमली पदार्थ पुरवणारे मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Recruitment: बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासा! बीएमसीच्या ९ हजार जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया कधी?

Shivneri Bus Expansion : ‘मुंबई–पुण्याची राणी’ आता महाराष्ट्रभर; व्होल्वो आणि स्लीपर सुविधांसह शिवनेरीचा होणार विस्तार

Kitchen Hacks: सफरचंद-बटाटा कापल्यानंतर लगेच काळे पडतात? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा अन् पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update : इराणी जहाजावर पाणबुडीने केलेल्या हल्ल्यात १०१ जण बेपत्ता, ७८ जण जखमी

Nashik Municipal Corporation : हरित नाशिकसाठी मनपाचा २५ कोटींचा प्लॅन; वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी तिजोरी उघडली!

SCROLL FOR NEXT