मुंबई

ठाणे रेल्वे स्थानकात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी

CD

ठाणे स्थानकावर प्रवाशाचा मोबाईल लांबवला
पुण्यातील प्रवाशाला फटका; ठाणे लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल
ठाणे, ता. ४ : रेल्वे स्थानकावरील सकाळच्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने प्रवाशाचा सुमारे १६ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला आहे. पुणे-चिंचवड येथून आलेल्या एका ५४ वर्षीय व्यक्तीला या चोरीचा फटका बसला असून, याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुणे-चिंचवड येथील वाल्हेकर वाडीत राहणारे छगण मोहन आडागंळे (५४) हे आपल्या मुलीसह मुलुंड येथे अंध व्यक्तींसाठी मिळणारे रेशन घेण्याच्या कामानिमित्त आले होते. काम आटोपून पुण्याला परतण्यासाठी त्यांनी मंगळवारी (ता. ३) सकाळी ८:०६ वाजता मुलुंड येथून ‘डाऊन खोपोली फास्ट लोकल’ पकडली. सकाळी ८:१० च्या सुमारास ही लोकल ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ५ वर आली. या वेळी गाडीतून उतरत असताना प्रचंड गर्दी होती. याच गोंधळाचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या पँटच्या खिशात असलेला १६,५०० रुपयांचा मोबाईल अत्यंत शिताफीने चोरला.

फलाटावर उतरल्यानंतर आडागंळे यांना खिशात मोबाईल नसल्याचे जाणवले. त्यांनी तातडीने दुसऱ्या प्रवाशाच्या फोनवरून स्वतःच्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला रिंग गेली. मात्र, काही वेळातच चोरट्याने मोबाईल बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाणे गाठले. ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

शाब्बास पठ्ठ्या... मॅच विनिंग खेळीचं संजू सॅसमनला मिळालं गिफ्ट, ICC ने केली मोठी घोषणा; अभिषेक शर्मासाठी धोक्याची घंटा

Horoscope : उद्या 5 मार्च! 'या' 5 राशीच्या लोकांसाठी 'महालक्ष्मी-धनलाभ योग'; होईल आर्थिक फायदा, नोकरी-धंद्यात काहीतरी मोठं घडणार

Latest Marathi News Live Update : धुळ्यात संताजी नगरात मध्यरात्री 5 दुचाकींना आग; संशयित आरोपी गजाआड

T20 WC, IND vs ENG: अभिषेक शर्माचा खराब फॉर्म, प्लेइंग-११ मधील जागेवर प्रश्नचिन्ह... भारताचे कोच काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT