भारतीय महिला कुस्ती संघाचे सुवर्ण यश
ठाणे महिला पोलिस नाईक देवकी यांच्या नेतृत्वाखाली मान उंचावली
ठाणे शहर, ता. ४ (बातमीदार) ः अल्बेनियाची राजधानी तिराना येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठित ‘मुहामेट मसलो रँकिंग सिरीज’ स्पर्धेत भारतीय महिला कुस्ती संघाने सुवर्ण कामगिरी केली आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या मान्यतेखाली आयोजित ही स्पर्धा जागतिक कुस्तीपटूंसाठी महत्त्वाची मानली जाते. या स्पर्धेतील यशाने भारतीय खेळाडूंच्या रँकिंगमध्ये मोलाची भर पडली असून, २०२८ च्या ऑलिम्पिकच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
वागळे इस्टेट पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक देवकी राजपूत-भापकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली महिला कुस्ती संघाने चांगली कामगिरी केली असून, विजयी खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. देवकी यांच्या प्रशिक्षकत्वाखाली सलग सहाव्या विजेतेपदाची ही नोंद झाली आहे. कोटीया झग्रेब २०२६ सीनियर रँकिंग सिरीजमध्ये एक सुवर्ण, तीन रौप्य, चार कांस्य पदक पटकावले होते.
महिला पोलिस नाईक देवकी राजपूत-भापकर या महाराष्ट्र पोलिसांकरिता आदर्श आहेत. त्यांच्या प्रशिक्षकत्वाखाली खेळाडू पोलिस देशाकरता मौल्यवान कामगिरी करतील, अशी आशा आहे.
- शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वागळे इस्टेट पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.