वायुगळतीत निष्काळजी
बोईसर एमआयडीसीतील कंपनीवर गुन्हा
बोईसर, ता. ४ (वार्ताहर) : बोईसर एमआयडीसीतील भूखंड क्रमांक डी-१७ वरील भगेरिया इंडस्ट्रीज प्रा. लि. कारखान्यात सोमवारी दुपारी ओलिअम रसायनांच्या गळतीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणात कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास उत्पादन प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन किलोलिटर क्षमतेच्या डे-टँकच्या लेव्हल इंडिकेटर ग्लासमधून किरकोळ गळती सुरू झाली. काही वेळात हवेत सल्फर ट्रायऑक्साइड वायूचे दाट धुके निर्माण झाले. त्यामुळे कारखाना परिसरात काही काळ दृश्यमानता कमी झाली होती. वाऱ्याच्या दिशेने धुके दक्षिणेकडे जवळपास एक किलोमीटरपर्यंत पसरले होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलिस, औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गळतीचा प्रसार रोखण्यासाठी तज्ज्ञ पथकाने दुपारी ३.४० वाजता गळती रोखण्याची कारवाई सुरू केली होती. त्यानतर सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली होती.
-----------------------------
जीवितास धोक्याचा ठपका
सालवड येथील भाविका मोर (वय ४०) यांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात तक्रार दाखल केली. कंपनीच्या निष्काळजीमुळे ओलिअम साठवण टाकीतून गळती होऊन विषारी वायू बाहेर पसरल्याने मानवी जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८०, १२५, २८६ व २८९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.