हसमुख गेहलोत स्थायी समिती सभापती
कॉँग्रेसचे अनिल सावंत यांचा १३ विरुद्ध तीन मतांनी पराभव
भाईंदर, ता. ४ (बातमीदार) : मिरा-भाईंदर पालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी भाजपचे हसमुख गेहलोत यांची निवड झाली. त्यांनी कॉँग्रेसचे अनिल सावंत यांचा १३ विरुद्ध तीन मतांनी पराभव केला. तर महिला बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक बिनविरोध झाली.
स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी भाजपकडे १३ तर कॉँग्रेस, शिवसेना यांच्या शहर विकास आघाडीकडे तीन सदस्य आहेत. त्यामुळे सभापतिपदाची निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे निश्चित होते. या निवडणुकीसाठी कॉँग्रेसकडून अनिल सावंत यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याचे बोलले जात होते. विशेष म्हणजे, स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपचे वरिष्ठ नगरसेवक प्रकाश ऊर्फ मुन्ना सिंहदेखील इच्छुक होते; मात्र गेहलोत आमदार नरेंद्र मेहता यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळेल, असा अंदाज होता.
----------------------------
अनिता पाटील, हेमा बेलानी बिनविरोध
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी भाजपच्या वरिष्ठ नगरसेविका अनिता पाटील तर उपसभापतिपदी हेमा बेलानी यांची बिनविरोध निवड झाली. समितीच्या नऊ सदस्यांपैकी भाजपकडे सात, विरोधी पक्षाकडे दोनच सदस्य आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्जावर सूचक, अनुमोदक यांच्या स्वाक्षरी आवश्यक असतात; परंतु विरोधी पक्षांकडे दोनच सदस्य असल्याने उमेदवाराला अनुमोदन देण्यासाठी सदस्यच नसल्याने बिनविरोध निवड झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.