वाशी, ता. ४ (बातमीदार) : राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय परिसंवाद शैक्षणिक वातावरणात पार पडला. ऐरोली येथील नवी मुंबई महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये हा परिसंवाद सोमवारी (ता. २) पार पडला.
मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र व आंबेडकर चेअर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विकासदृष्टी’ या विषयावर आधारित या परिषदेत देश-विदेशातील अभ्यासकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्रा. मनीषा कर्णे, डॉ. कैलास गायकवाड आदी उपस्थित होते. निवृत्त अधिकारी जे. एस. सहारिया यांनी भारतीय राज्यघटनेतील मूलभूत मूल्ये, समानता आणि सामाजिक न्याय यांचे महत्त्व अधोरेखित केले.
या परिषदेत विविध तांत्रिक सत्रांमध्ये एकूण १६ संशोधनपर निबंध सादर करण्यात आले. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, हैदराबाद आदी राज्यांतील अभ्यासकांसह साऊथॅम्प्टन युनिव्हर्सिटी, लंडन येथील संशोधकानेही आपला शोधनिबंध सादर केला. थायलंड येथील डॉ. श्रीरंजन आवटे यांनी संविधानिक मूल्ये समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता अधोरेखित करत सामाजिक न्यायाच्या दिशेने सातत्याने वाटचाल करण्याचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.