मुंबई

कबड्डी महोत्सवात स्वस्तिक व स्वराज्य संघांचे विजेतेपद

CD

कबड्डी महोत्सवात स्वस्तिक व स्वराज्य संघांचे विजेतेपद

मुलुंड, ता. ४ ( बातमीदार) : मुलुंड येथे सुराज फाउंडेशन आयोजित आणि एलआयसी ऑफ इंडिया पुरस्कृत रंगीबेरंगी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडली. छत्रपती संभाजीराजे क्रीडांगणावर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘काव्य प्रभात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, मुग्धा माळी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी कवितावाचन करून उपस्थितांची दाद मिळवली. युवकांसाठी कबड्डी स्पर्धा आणि महिलांसाठी व्यापारी पेठ उपक्रमामुळे महोत्सवाला विशेष रंगत आली.
मुलुंड क्रीडा केंद्र आयोजित कबड्डी महोत्सव २०२६ च्या अंतिम फेरीत महिला व पुरुष गटातील सामने उत्कंठावर्धक ठरले. महिला गटात स्वराज्य स्पोर्टस (कांजूरमार्ग) यांनी आरंभ स्पोर्टस (मालाड) संघावर ३६-२२ असा विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. प्रसिता पान्हाळकर यांना सर्वोत्कृष्ट चढाईपटू, माधुरा सावंत यांना सर्वोत्तम बचावपटू, तर यशिका पुजारी हिला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.
पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळ (कुर्ला) यांनी अंतिम सामन्यात चेंबूर क्रीडा केंद्रावर २६-१४ अशी मात करत विजेतेपद पटकावले. आदिनाथ गायकवाड यांना सर्वोत्तम खेळाडू, सुजल सावंत यांना सर्वोत्तम बचावपटू, तर कुणाल पवार यांना सर्वोत्तम चढाईपटू म्हणून गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभ शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, मनसे नेते शिरीष सावंत व क्रीडा क्षेत्रामधील मान्यवर सुधाकर घाग यांच्या हस्ते पार पडला. विजेत्या संघांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT