मुंबई

पतीकडून पत्नीचा खून; पती अटकेत

CD

पतीकडून पत्नीचा खून; पती अटकेत

तारापूर, ता. ४ (बातमीदार) : येथील आंबातपाडा येथे पतीनेच पत्नीचा प्लॅस्टिकच्या दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तारापूर पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपी पतीस अटक करण्यात आली आहे.

आशा नीलेश आंबात (वय २४) असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून, तारापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २) होळी दहनानंतर रात्रीच्या सुमारास आशा हिला दिनेश ऊर्फ टिल्लू दांडेकर याच्यासमवेत एकत्र घरी येत असताना आशाचे पती नीलेश सुरेश आंबात याने पाहिले. यामुळे संतप्त झालेल्या नीलेश याने पहाटेच्या सुमारास झोपेतच पत्नी आशा हिचा प्लॅस्टिकच्या दोरीने गळा आवळून खून केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक निवास कणसे यांनी दिली. मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता आरोपी नीलेश सुरेश आंबात यास अटक करण्यात आली असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Visakhapatnam: स्टील प्लांटमध्ये मोठा अपघात! वितळलेलं स्टील कामगारांच्या अंगावर पडलं; ८ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

IND vs AFG: भारताविरुद्ध आऊट नसतानाही अफगाणिस्तानचा खेळाडूनं सोडलं मैदान अन् मग संघसहकाऱ्यांशीस झाला वाद; नेमकं प्रकरण काय?

Strait of Hormuz: होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ जहाजावर भीषण हल्ला! २४ भारतीय नाविक संकटात; बचावासाठी टाहो

Social Initiative: प्राध्यापक दांपत्याचा आहेराला नकार, वास्तुशांतीत फक्त वह्यांचा आहेर; १०,८१६ वह्या गरीब विद्यार्थ्यांना वाटपाचा संकल्प

LPG सिलिंडर पुन्हा महागणार! केंद्र सरकारचे संकेत, वाढीमागचं कारणही स्पष्ट सांगितलं

SCROLL FOR NEXT