नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : पाम बीच मार्गावरून तरुणीसह दुचाकीवरून कोपरखैरणे येथे जाणाऱ्या तरुणाला एका वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू, तर १७ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. ३) पहाटे सानपाडा येथे घडली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील तरुणाचे मुंडके धडावेगळे होऊन रस्त्यावर पडले. या अपघातात धडक देणाऱ्या वाहनचालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे. सानपाडा पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रशांत विजय जमदाडे (वय २३) आणि अल्पवयीन तरुणी दोघे कोपरखैरणे भागात राहण्यास असून, सोमवारी (ता. २) सायंकाळी ते दुचाकीवरून बाहेर गेले होते. त्यानंतर हे दोघेही मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून पाम बीच मार्गे कोपरखैरणेच्या दिशेने जात होते. या वेळी त्यांची दुचाकी सारसोळे सिग्नलकडून मोराज सर्कलच्या दिशेने जात असताना, सानपाडा येथील वळणावर भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, प्रशांतचे मुंडके धडापासून वेगळे होऊन रस्त्यावर पडले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणी गंभीररीत्या जखमी झाली असून, तिचे दोन्ही पाय आणि डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. तिच्यावर नेरूळ येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.