कामोठ्यात क्षुल्लक कारणावरून तरुणाचा चाकूने भोसकून खून
पनवेल, ता. ४ (वार्ताहर) : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन तरुणांनी एका तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी कामोठे सेक्टर-१४ परिसरात घडली. गौरव सातवीर पवार ऊर्फ काल्या (१९) आणि प्रेम प्रकाश पेटकर (१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खुनानंतर दोघेही पळून जाण्याच्या प्रयत्नात होते; मात्र कामोठे पोलिस ठाण्याच्या पथकाने त्यांना तत्काळ ताब्यात घेतले.
या घटनेतील मृत तरुणाचे नाव राहुल जयविंदर बुमबक (२३) असे असून, तोही सेक्टर-१४ परिसरात राहणारा होता. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास राहुल गावदेवी मंदिराजवळील जांभळीच्या झाडाखाली बसला होता. त्या वेळी त्याचा एक नातेवाईकही तेथे उपस्थित होता. दरम्यान, आरोपी गौरव आणि प्रेम तेथे आले आणि त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. ‘तू आमच्याकडे काय बघतोस?’ अशी विचारणा करून सुरू झालेला वाद झटापटीत बदलला. प्रेमने राहुलला पकडून ठेवले, तर गौरवने त्याच्या पोटात चाकूने वार केले. वार इतके गंभीर होते की चाकू पोटातच अडकला आणि राहुलचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत दोन्ही आरोपींना अटक केली तसेच खुनासाठी वापरलेला चाकू जप्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.