मुंबई

अखेर शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकारी निलंबित

CD

अखेर शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकारी निलंबित
विद्यार्थिनी आत्महत्याप्रकरणी आमदार संजय केळकर आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : मुरबाड तालुक्यातील मोरोशी आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापक आणि स्त्री अधीक्षिकेवर कारवाई झाली असली, तरी संबंधित प्रकल्प अधिकारी मात्र अद्याप पदावरच असल्याबद्दल आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रकल्प अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. त्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या निर्देशानंतर शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले.

मोरोशी आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीने २५ डिसेंबरला वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली. २६ डिसेंबरला अहवाल प्राप्त होताच मुख्याध्यापक प्रल्हाद भोई आणि अधीक्षिका जयश्री वागळे यांना निलंबित करण्यात आले. ग्रामीण भागातील आश्रमशाळांमध्ये सेवा-सुविधा आणि सुरक्षेचा अभाव असल्याचा मुद्दा उपस्थित करीत केळकर यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या जबाबदारीकडे लक्ष वेधले. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न होता तेच इतरांचे निलंबन करीत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच पीडित कुटुंबाला मदत देण्याची मागणीही केली.
मंत्री उईके यांनी पीडित कुटुंबाला दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिल्याची माहिती दिली. अखेर केळकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा निर्णय जाहीर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT