मुंबई

बोईसर गोळीबार घटनेतील आरोपीला यवतमाळमधून अटक

CD

बोईसर गोळीबार घटनेतील आरोपीला यवतमाळमधून अटक

तारापूर, ता. ४ (बातमीदार) : येथील वाळवे बस स्टॉप येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीला यवतमाळ जिल्ह्यातून अटक करण्यात बोईसर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले.

बोईसर जवळील बेटेगाव येथे चिकन भुजिंगचे दुकान चालविणाऱ्या उमेश घरत याचा त्याच्याकडे काम करणारी महिला आणि फिर्यादी प्रितेश वरखंडे यांचा प्रेमसंबंधाला विरोध होता; मात्र या दोघांनी विरोधाला न जुमानता मुरबे येथील मंदिरात प्रेमविवाह केला. याच रागातून आरोपी उमेश घरत याने २३ फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास बेटेगाव महागाव रस्त्यावरील वाळवे बस स्टॉप येथील घरात घुसून प्रितेश वरखंडे यांचे वडील सुरेश यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तर प्रितेश आणि त्याची पत्नी यांना मारहाण करून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकण्याचा प्रयत्न करून पसार झाला. गोळीबाराच्या घटनेत सुरेश वरखंडे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना बेटेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांचे नेतृत्वाखाली बोईसर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक आरोपीच्या शोधार्थ रवाना करण्यात आले. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती, सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे १ मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड जवळील महामार्गावरून ताब्यात घेत अटक करण्यात आली. आरोपी उमेश घरात याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT