मुंबई

पोलीस असल्याचे भासवून पाच लाखांची लूट

CD

पोलिस असल्याचे भासवून पाच लाखांची लूट

कोळसेवाडी पोलिसांची पाच तासांत कारवाई

कल्याण, ता. ४ (वार्ताहर) : कल्याण पूर्व परिसरात पोलिस असल्याचे भासवून पाच लाख रुपयांची लूट केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुट्ट्या नोटांच्या प्रलोभनाने बोलावून तक्रारदाराची रोकड हिसकावून आरोपींनी पळ काढला; मात्र तत्पर कारवाई करीत कोळसेवाडी पोलिसांनी अवघ्या पाच तासांत मुख्य आरोपींना जेरबंद केले.

पुण्यातील दीपक शिंदे यांना पाच लाख रुपयांच्या बदल्यात सुट्ट्या नोटांमध्ये सात लाख रुपये देण्याचे प्रलोभन दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आली. ठरल्याप्रमाणे ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ पैसे घेऊन आले असता, काही जण स्कॉर्पिओमधून येऊन स्वतःला पोलिस असल्याचे सांगत त्यांनी पैशांची बॅग हिसकावून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिस ठाण्याने तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणातून आरोपींची गाडी जुन्या पुणे महामार्गावरून जात असल्याचे निष्पन्न झाले. तळेगाव दाभाडे पोलिसांच्या मदतीने सोमाटणे टोलनाक्यावर चार आरोपींना अवघ्या पाच तासांत ताब्यात घेण्यात आले.

पुढील तपासात इतर आरोपींचा माग काढत राहुरी पोलिसांच्या सहकार्याने आणखी चौघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून दोन लाख ३६ हजार रुपये रोख, दोन स्कॉर्पिओ गाड्या व नऊ मोबाईल जप्त करण्यात आले. या कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस पथकाचे कौतुक केले असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime news : पुण्यात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारानंतर दगडाने ठेचून हत्या; मृतदेह झुडपात लपवला, मुंबई-बंगळूर महामार्गावर लोकांचा आक्रोश

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालमधील १४ केंद्रांवर आज फेरमतदान; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

लग्नाचे नाव घेताच, पलटला... मोहम्मद शमीच्या भावावर महिलेचे गंभीर आरोप

IPL 2026 : अक्षर पटेलने 'त्या' दोघांना दिल्ली कॅपिटल्सचा विजय समर्पित केला; मन जिंकणारी कृती, फॅन्सही हळहळले... नेमकं काय घडलं?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २ मे २०२६ ते ८ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT