मुंबई

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

CD

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

भाईंदर, ता. ४ (बातमीदार) : मिरा रोड येथे एका दहावर्षीय मुलीवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला; पीडित मुलीने प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने आरोपी पळून गेला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

मिरा रोडच्या नयानगर भागात एका दहावर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला; मात्र पीडितेने प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने आरोपी पळून गेला. पीडित मुलगी आपल्या आईसोबत मंगळवारी (ता. ३) रात्री ९.३०च्या सुमारास बाजारातून घरी परत येत होती. इमारतीत शिरताना तिची आई सोबत नसल्याचा गैरफायदा घेत एक अनोळखी व्यक्ती तिच्या पाठोपाठ इमारतीत शिरली. पीडितेला तळमजल्यावर जिन्यातच गाठून त्याने तिच्यासोबत गैरकृत्य करून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला; मात्र पीडितेने घाबरून आरडाओरड केल्याने आरोपी पळून गेला. याप्रकरणी नयानगर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NZ beat SA in SF : दक्षिण आफ्रिका 'Chokers'! न्यूझीलंडचा T20 World Cup फायनलमध्ये प्रवेश, फिन'टॅस्टीक' शतक

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT