सुधारित इंट्राे
-----
हरित लवादाच्या सुनावणीत हस्तक्षेप नाही
नाशिक येथील तपोवनप्रकरणी उच्च न्यायालयाचा पुनरुच्चार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात प्रस्तावित साधुग्राम आणि प्रदर्शन केंद्र (माईस हब) उभारण्यासाठी हजारो वृक्षतोडीसंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती दिली आहे. तथापि लवादाऐवजी उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात यावी, अशी भूमिका नाशिक महापालिकेने बुधवारी (ता.४) उच्च न्यायालयात मांडली. मात्र, आम्ही लवादाच्या सुनावणीमध्ये हस्तक्षेप करणार नाही. या आपल्या भूमिकेचा न्यायालयाने बुधवारी पुनरुच्चार केला.
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात प्रस्तावित साधुग्राम आणि प्रदर्शन केंद्र (माईस हब) उभारण्यासाठी हजारो वृक्षतोडीसंदर्भात राष्ट्रीय हरित लवादने वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात सुनावणी नको, अशी भूमिका नाशिक महापालिकेने बुधवारी (ता. ४) उच्च न्यायालयात मांडली; मात्र आम्ही लवादाच्या सुनावणीमध्ये हस्तक्षेप करणार नाही, या आपल्या भूमिकेचा न्यायालयाने बुधवारी पुनरुच्चार केला.
आम्ही हरित लवादाला कोणतेही आदेश देणार नाही. उच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे असा अर्ज नाशिक पालिकेने लवादासमोर करावा आणि कोणतेही आदेश पारित करू नका, अशी विनंती करावी. आम्ही कोणतेही आदेश देणार नाही, असेही मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयातील याचिकेत लवादासमोरील तक्रारदारांना प्रतिवादी करायचे असले, तरीही नाशिक पालिकेला न्यायालयात तसा अर्ज करावा लागेल, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.
सुनावणी आठवडाभरासाठी तहकूब
तत्पूर्वी, हे प्रकरण हरित लवादासमोर सुरू असून लवादाने पुढील सुनावणी ६ एप्रिलला ठेवली आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी एकाच प्रकरणावर सुनावणी घेता येणार नाही. न्यायालयाने सुनावणी सूचीबद्ध करून लवादाला याप्रकरणी कोणतेही आदेश पारित करू नये, असे आदेश देण्याची विनंती महापालिकेतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली; परंतु न्यायालयाने त्याला नकार दिला. त्यानंतर न्यायालयाच्या सूचनेनुसार, लवादाकडे अर्ज करण्यात येईल. त्यामुळे सुनावणी तहकूब करण्याची विनंती पालिकेने केली. त्यावर याच कारणासाठी सुनावणी तहकूब करण्याची ही तिसरी वेळ असल्याचे सुनावून न्यायालयाने सुनावणी आठवडाभरासाठी तहकूब केली.
झाडे अन्यत्र हलवली जातील
तपोवनातील वृक्षतोडीच्या प्रस्तावावर सूचना आणि हरकती मागण्यात आल्या होत्या. तसेच प्रस्तावावर हरकती घेणाऱ्यांना सुनावणीही देण्यात आली आहे. त्याबाबतचा अंतिम अहवाल महापालिकेकडे सादर करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांनी न्यायालयाला दिली. या अहवालानुसार, संरक्षित करण्यात येणारी झाडे तोडली जाणार नाही. स्थलांतरित करण्यात आलेली झाडे अन्यत्र हलवली जातील व आवश्यक असल्यासच झाडे तोडली जातील, असेही साठ्ये यांनी न्यायालयाला सांगितले.
काय प्रकरण?
नाशिक येथील प्रस्तावित कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारण्यात येणार आहे. तपोवनातील १,८०० झाडांची कत्तल केली जाणार आहे. या निर्णयाला पर्यावरणप्रेमी, स्थानिकांचा विरोध असून मुळात कुंभमेळ्यासाठी साधुग्राम तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास ४० वर्षे जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवणार आहे, असा दावा नाशिकस्थित मधुकर जगताप यांनी वकील पायल वर्धन आणि ओमकार वाबळे यांच्यामार्फत केलेल्या जनहित याचिकेतून केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.