मुंबई

मुरबाड नगरपंचायतीची ११ मार्च रोजी विशेष सभा

CD

मुरबाड नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीसाठी ११ मार्चला विशेष सभा
मुरबाड, ता. ५ (बातमीदार) : मुरबाड नगर पंचायतीच्या रिक्त असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी येत्या ११ मार्चला विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी बुधवारी (ता. ४) यासंदर्भात अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. तत्कालीन नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्यावर नगर पंचायतीच्या १३ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र या ठरावावर प्रत्यक्ष चर्चा होण्यापूर्वीच चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर आता नवीन नगराध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
मुरबाड नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीसाठी ११ मार्चला दुपारी १२ वाजता नगर पंचायत सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, या सभेचे कामकाज कल्याण विभागाचे उपविभागीय अधिकारी पीठासीन अधिकारी म्हणून पाहतील. मुरबाड नगर पंचायतीमधील सध्याचे पक्षीय समीकरण पाहता निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत १७ सदस्य आहेत.

कार्यकाळ केवळ ११ महिन्यांचा
मुरबाड नगर पंचायतीची विद्यमान मुदत ११ फेब्रुवारी २०२७ला संपत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित नगराध्यक्षांना कामासाठी केवळ ११ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. राजकीय वर्तुळात या अल्प कालावधीसाठी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय बलाबल
गट/पक्ष सदस्य संख्या
भाजप पुरस्कृत (भाजप ५ + अधिकृत भाजप ३) ८
शिवसेना (शिंदे गट) ५
परिवर्तन पॅनल (विरोधक) ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

T20 WC, IND vs ENG SF: भारत-इंग्लंड सामन्यासाठी वानखेडेवरील '७' नंबरची खेळपट्टी वापरली जाणार; २४ तासांत फिरला गेम... स्टेडियमवरून ताजे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : एसटी चालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी बंधनकारक

Kolhapur Wrestling : कोल्हापूरच्या मातीचा गाजणार पुन्हा एकदा जलवा; कुंभी कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेत ५०० हून अधिक पैलवान उतरणार आखाड्यात

Beed News : गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड? बर्दापूर पोलिसांची मोठी कामगिरी; मूर्ती फाट्याजवळ १० लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला, तिघांना बेड्या

SCROLL FOR NEXT