मुंबई

डोंबिवलीत नववर्ष स्वागतयात्रेचा जल्लोष

CD

डोंबिवलीत नववर्ष स्वागतयात्रेचा जल्लोष
यंदाची संकल्पना ‘वंदे मातरम्’चे १५०वे वर्ष; ७ मार्चपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल

डोंबिवली, ता. ५ : गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या स्वागतयात्रांची जननी असलेल्या डोंबिवली शहरात यंदा हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे २८वे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे. यंदाची स्वागतयात्रा ‘वंदे मातरम्’चे १५०वे वर्ष या विशेष संकल्पनेवर आधारित असेल, अशी माहिती श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यंदाच्या स्वागतयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे संयोजन समितीत तरुणांचा असलेला मोठा सहभाग. भावी पिढीवर राष्ट्रीय संस्कार व्हावेत तसेच त्यांच्यात कुटुंब प्रबोधन, समरसता, नागरी कर्तव्य आणि पर्यावरणाची जाणीव निर्माण व्हावी, या दृष्टीने कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

शनिवारी (ता. ७) डोंबिवलीतील ३७ शाळांमधील सुमारे १,८०० विद्यार्थी सामूहिक देवदेशोपासना आणि ‘वंदे मातरम्’ गायनात सहभागी होतील. त्यानंतर रविवारी १५ मार्चला अथर्वशीर्ष पठण, राष्ट्रभक्तीपर गीत गायन, वादन-नृत्य स्पर्धा आणि तरुणाईचे आकर्षण असलेली भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी १७ मार्चला सामूहिक श्रीसूक्त पठण, दीपोत्सव आणि आकर्षक रांगोळी प्रदर्शन होईल. तर बुधवारी १८ मार्चला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त भागशाळा मैदान येथे सायंकाळी ‘शिवशंभू रणशौर्य अमृतगाथा’ हा गीत-नृत्याविष्कार सादर करून आदरांजली वाहिली जाईल.

वक्फ विधेयकात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि महाराष्ट्रातील आगामी कुंभमेळ्याचे नियोजक महामंडलेश्वर महंत सुधीरदास महाराज (नाशिक) या वेळी उपस्थिताना मार्गदर्शन करतील. तसेच ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे हे स्वागतयात्रेत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेला उपमहापौर राहुल दामले, नगरसेवक मंदार हळबे, श्री गणेश मंदिर संस्थेच्या अध्यक्षा अलका मुतालिक, उपाध्यक्ष सीए सुहास आंबेकर, श्रीपाद कुलकर्णी, गौरी कुंटे, राजय कानिटकर आणि संयोजन समिती प्रमुख अमेय काटदरे उपस्थित होते.

पाडव्याचा मुख्य सोहळा
गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे १९ मार्चला कल्याण-डोंबिवलीच्या महापौर ॲड. हर्षाली चौधरी (थविल) यांच्या हस्ते श्री गणेशाची महापूजा होईल. पंचांग वाचन, श्रीराम महापूजा आणि प्रातिनिधिक गुढी उभारल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात सकाळी ७:१५ वाजता पालखीचे प्रस्थान होईल.

पालखीचा मार्ग
भागशाळा मैदान-पंडित दीनदयाल पथ-द्वारका हॉटेल-रेल्वे मार्ग-शिवमंदिर पथ-राजेंद्र प्रसाद पथ-चार रस्ता-मानपाडा रोड-बाजीप्रभू चौक-फडके पथ-आप्पा दातार चौक.

१०० संस्था सहभागी
यंदाच्या यात्रेत सुमारे १०० संस्था सहभागी होणार आहेत. शहरातील सर्व मंदिरांमध्ये या दिवशी समृद्धीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच तरुणांसाठी सोशल मीडिया पेजवरून विविध स्पर्धांची घोषणा करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात जमीन मोजणीची प्रक्रिया वेगवान होणार; महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला, नागरिकांना मोठा दिलासा

रश्मिकाच्या आईने नेसलेली कोडावा पद्धतीची साडी तुम्हाला माहित आहे का? साडीचा पदर अन् नेसण्याची पद्धत आहे फारच खास, Video

Mahadev Munde Murder Case: ''महादेव मुंडेंचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन'', नार्को टेस्टमध्ये खुलासा झाल्याचा फड यांचा दावा

“५ दिवस झाले... आम्हाला घरी जायचंय, किमान कळवा तरी आज की उद्या जाता येईल!” भारतात अडकलेल्या खेळाडूचा धीर संपतोय...

Mumbai News: लोकलचा प्रवास सह्याद्रीच्या डोंगररांगांतून होणार, पनवेल-कर्जत कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात; कधी सुरू होणार?

SCROLL FOR NEXT