मुंबई

रुग्णालयातील सफाई कामगारांचे बेमुदत उपोषण

CD

तुर्भे, ता. ५ (बातमीदार) : वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयातील सफाई कामगारांनी कथित आर्थिक गैरव्यवहार आणि अन्यायकारक बदली प्रक्रियेविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही आणि सर्व कामगारांची सरसकट बदली केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू असले तरी त्याचा फटका रुग्णसेवेवर बसला जाणार नाही, याची दक्षता आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

रुग्णालयात सुमारे २०० सफाई कामगार कार्यरत असून, त्यांची वर्षातून एकदा बदली केली जाते. मात्र, या बदली प्रक्रियेत आर्थिक व्यवहार होत असल्याचा दावा कामगारांनी केला आहे. काही ठरावीक कामगारांना दरमहा अतिरिक्त दिवस लावून अधिक पगार दाखवला जातो आणि त्यानंतर त्या रकमेतील काही हिस्सा परत घेतला जातो, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या सर्व आर्थिक व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच सर्व कामगारांची पारदर्शक आणि सरसकट बदली करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलन असले तरी रुग्णांना वेठीस धरले नाही. हा लढा प्रशासनासोबत आहे, रुग्णांसोबत नाही. कामगारांनी स्वच्छता व इतर कामे केली असून, ज्या कामगारांची सुट्टी आहेत, असेच कामगार आंदोलनात सहभागी झाले आहेत.
- मंगेश लाड, समाज समता कामगार संघटना, सरचिटणीस

रुग्णालयाकडून डॉ. राजेश म्हात्रे यांच्यासोबत आंदोलकर्ते व ठेकेदार यांची बैठक सुरू असून, संबंधित प्रकाराबाबत समोरासमोर चर्चा केली जाईल. त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल. हे प्रकरण सामंजस्याने सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील.
- डॉ. प्रशांत जवादे, मुख्य वैद्यकीय अधिकारी

महाराष्ट्रात जमीन मोजणीची प्रक्रिया वेगवान होणार; महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला, नागरिकांना मोठा दिलासा

रश्मिकाच्या आईने नेसलेली कोडावा पद्धतीची साडी तुम्हाला माहित आहे का? साडीचा पदर अन् नेसण्याची पद्धत आहे फारच खास, Video

Mahadev Munde Murder Case: ''महादेव मुंडेंचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन'', नार्को टेस्टमध्ये खुलासा झाल्याचा फड यांचा दावा

“५ दिवस झाले... आम्हाला घरी जायचंय, किमान कळवा तरी आज की उद्या जाता येईल!” भारतात अडकलेल्या खेळाडूचा धीर संपतोय...

Mumbai News: लोकलचा प्रवास सह्याद्रीच्या डोंगररांगांतून होणार, पनवेल-कर्जत कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात; कधी सुरू होणार?

SCROLL FOR NEXT