मुंबई

सीसीटीव्हीच्या मदतीने काही तासांत घरफोडीचा छडा

CD

अंबरनाथ, ता. ५ (वार्ताहर) : घरात कोणी नसल्याची संधी साधून घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अंबरनाथ पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करत गुन्ह्याची उकल केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचत पोलिसांनी पावणे दोन लाख रुपयांचे दागिनेही हस्तगत केले आहेत. या कारवाईमुळे अंबरनाथ परिसरातील घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंबरनाथ येथील महंतराम सुदर्शनदास चौक, भंगार गल्ली परिसरात राहणारे करम हुसेन खान (वय ३५) हे ट्रकचालक आहेत. ते जय अंबे इंटरप्राईजसमोर असलेल्या बुवापाडा भागातील भाड्याच्या खोलीत राहतात. त्यांच्या पत्नी पूजा या घरकाम करून उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी पूजा आजारी असल्याने माहेरी गेल्या होत्या, तर करम खान हे वाहनचालक असल्याने आठ दिवसांपासून बाहेरगावी होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर लॉकर रॉडच्या साह्याने उचकटून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. दुसऱ्या दिवशी करम खान घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ अंबरनाथ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच अंबरनाथ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताचा माग काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली. अटक आरोपी हा सराईत घरफोड्या असून, त्याने यापूर्वी तब्बल ११ घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे. याशिवाय आणखी तीन गुन्ह्यांची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीकडून पावणेदोन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास अंबरनाथ पोलिस करत आहेत.

चोरी झालेला ऐवज
चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये सुमारे ६० हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, ४० हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे झुमके, ३० हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे टॉप्स, ५० हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची अंगठी; तसेच ६० हजार व ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पेंडले असा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्याने नेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात जमीन मोजणीची प्रक्रिया वेगवान होणार; महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला, नागरिकांना मोठा दिलासा

रश्मिकाच्या आईने नेसलेली कोडावा पद्धतीची साडी तुम्हाला माहित आहे का? साडीचा पदर अन् नेसण्याची पद्धत आहे फारच खास, Video

Mahadev Munde Murder Case: ''महादेव मुंडेंचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन'', नार्को टेस्टमध्ये खुलासा झाल्याचा फड यांचा दावा

“५ दिवस झाले... आम्हाला घरी जायचंय, किमान कळवा तरी आज की उद्या जाता येईल!” भारतात अडकलेल्या खेळाडूचा धीर संपतोय...

Mumbai News: लोकलचा प्रवास सह्याद्रीच्या डोंगररांगांतून होणार, पनवेल-कर्जत कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात; कधी सुरू होणार?

SCROLL FOR NEXT