उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : धूलिवंदन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत उल्हासनगर वाहतूक विभागाने दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात कडक मोहीम हाती घेतली आहे. या विशेष मोहिमेत अवघ्या दोन दिवसांत ४९पेक्षा अधिक मद्यधुंद वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
उल्हासनगर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी संजय बेंद्रे, जितेंद्र चित्ते, मनोज काळे, लक्ष्मण पांढरे, पंढरीनाथ काळे, अरुण गिरमे, शशिकांत निकाळे, सुनील संकपाल, चंदू पागी, नाना आव्हाड आणि भारत खांडेकर यांच्या पथकाने शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली. या कारवाईदरम्यान दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या ३९ वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तर बुधवारी संध्याकाळपर्यंत आणखी १०हून अधिक वाहनचालकांवर कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
होळीच्या काळात बेदरकार वाहन चालवणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवण्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मोहीम सुरू केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पुढील काही दिवस ही मोहीम सुरू राहणार असून मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत उल्हासनगर वाहतूक पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. काही दिवसांत शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी सुरू ठेवली जाईल. नागरिकांनी दारू पिऊन वाहन चालवू नये आणि स्वतःसह इतरांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी.
- राजेश शिरसाठ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.