मुंबई

जयेश पाटील यांचा पक्षाला रामराम

CD

जयेश पाटील यांचा पक्षाला रामराम
विरार (बातमीदार) ः वसई-विरार महापालिका निवडणुकीदरम्यानच्या नाराजीतून आगरी सेनेचे पालघर जिल्हा प्रवक्ते जयेश जयवंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे आगरी सेनेत उभी फूट पडल्याची चर्चा रंगली आहे. वसई-विरार पालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपात भाजपने आगरी सेनेला दोन जागा सोडल्या होत्या. जयेश पाटील प्रभाग एकमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते; पण त्यांच्याऐवजी विजय घरत यांना प्राधान्य देण्यात आले. तर दुसरी जागा कैलास पाटील यांच्या कुटुंबातील महिला उमेदवाराला देण्यात आली होती. उमेदवारी मिळाली नसल्याने जयेश पाटील नाराज असल्याची चर्चा होती. त्यानुसार त्यांनी आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी, उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. वैयक्तिक कारणास्तव पद सोडत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच संघटनेत काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल कृतज्ञ असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

चिमुकला पाण्यात बुडत होता; वाचवण्यासाठी दोघांची नदीत उडी अन्...; महादेव घाटावरील पिकनिकचा आनंद क्षणात शोकांतिकेत

Marathwada Farmers: ऐन हंगामात निसर्गाचा घाला! केळी, डाळिंब, मोसंबी बागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी

Bajaj Best Mileage Bikes : मार्केटमध्ये एक दमदार बाईक! 100 कि.मी. मायलेज अन् 91 हजार किंमत, पेट्रोलचं टेन्शन दूर

TasteAtlas च्या जगातील सर्वोत्तम कोळंबी पदार्थांच्या यादीत 'चिंग्री मलाई करी'; जाणून घ्या या प्रसिद्ध बंगाली पदार्थाचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT