मुंबई

‘कोकण सरस’चे महिलांना व्यासपीठ

CD

‘कोकण सरस’चे महिलांना व्यासपीठ
विरार येथे स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांचे प्रदर्शन
विरार, ता. ५ (बातमीदार)ः ग्रामीण भागांतील महिलांच्या कौशल्याला वाव मिळावा, म्हणून विरार येथील म्हाडा मैदानात १२ ते १६ मार्च यादरम्यान कोकण सरस २०२६ हा उपक्रम होणार आहे. याअंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या विविध उत्पादने पाहण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा परिषद पालघर, वसई-विरार महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या मेळाव्यात स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ, घरगुती मसाले, पारंपरिक ग्रामीण हस्तकला, कलाकुसरीच्या वस्तू, वारली पेंटिंग, कापडी पिशव्या तसेच विविध हस्तनिर्मित उत्पादने नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहेत. महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, उत्पन्न वाढवणे, आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे, हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यंदाच्या मेळाव्यात कोकणातील सिंधुदुर्ग ते मोखाडा येथील ग्रामीण पारंपरिक चवींचा आस्वाद येथे घेता येणार आहे. तसेच विविध जिल्ह्यांतील स्वयंसहाय्यता समूहांच्या हस्तकला, प्रक्रिया उद्योगांसह खाद्यपदार्थांचे १५० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांसाठी नियंत्रण, आरोग्य कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
---------------------------
पालिकेची यंत्रणा सज्ज
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते यांच्या नियोजनातून राबवण्यात येत आहे. तसेच वसई-विरार महापालिकेचे महापौर अजीव पाटील, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, दीपक सावंत यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
---------------------------------
सरस मेळाव्यामुळे महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होणार असून, दीर्घकालीन ग्राहकवर्ग निर्माण करण्याची संधी मिळणार आहे, तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांच्या खरेदीबरोबर खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यावा.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त, वसई-विरार पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Murder Case: ''महादेव मुंडेंचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन'', नार्को टेस्टमध्ये खुलासा झाल्याचा फड यांचा दावा

Mumbai News: लोकलचा प्रवास सह्याद्रीच्या डोंगररांगांतून होणार, पनवेल-कर्जत कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात; कधी सुरू होणार?

Pune Accident : पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; कंटेनरने ४ गाड्यांना उडवले, ८ जण गंभीर जखमी

Deeya Yadav : १६ वर्षीय दीया यादवचे वन डेत द्विशतक; २२ चौकार अन् ७ षटकारांचा पाऊस, संघाच्या ३५६ धावा अन् २४७ धावांनी विजय

Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा भारतावर परिणाम! तेलापासून मसाल्यांपर्यंत अनेक वस्तू महाग, जाणून घ्या यादी...

SCROLL FOR NEXT