उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : शालेय विद्यार्थ्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी पुढाकार घेतला आहे. शाळांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उल्हासनगर विभागातील प्री-स्कूल, प्राथमिक शाळा आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राध्यापकांची विशेष बैठक घेऊन सुरक्षा ऑडिटसंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी उल्हासनगर पोलिसांनी शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अलीकडे घडलेल्या विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर विभागातील सर्व प्री-स्कूल, प्राथमिक शाळा तसेच महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राध्यापकांची शहीद जनरल अरुण कुमार वैद्य सभागृहात विशेष बैठक घेतली. सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचनांची सविस्तर माहिती देण्यात आली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणे, शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आणि त्यांची पडताळणी करणे, तसेच शाळांच्या बस व व्हॅन चालक आणि मदतनीस यांची पार्श्वभूमी तपासणे याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा बस व व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. मुख्याध्यापक व प्राध्यापकांकडून शाळांच्या सुरक्षा ऑडिटसंदर्भात विविध सूचना व समस्या जाणून घेत त्यावर मार्गदर्शन केले.
बैठकीला सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांच्यासह उल्हासनगर महापालिका शिक्षण विभागाचे अधिकारी योगेश मराठे, मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे, उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष आव्हाड, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कोळी, उल्हासनगर विभागातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व प्राध्यापक मिळून सुमारे १४० ते १५० जण उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची सुरक्षा ही पोलिस प्रशासनासाठी अत्यंत संवेदनशील आणि सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. शाळा परिसरासह बस-व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे शाळांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वाहनचालक व मदतनीसांची चारित्र्य पडताळणी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि नियमित सुरक्षा ऑडिट अत्यंत गरजेचे आहे. पोलिस विभाग शाळा प्रशासनासोबत समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना राबवणार आहे. कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्या.
- सचिन गोरे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ४
उल्हासनगर : टाऊन हॉलमध्ये पोलिस प्रशासन आणि शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांची बैठक पार पडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.