मुंबई

सेवा रस्त्यांवर अरेरावी

CD

सेवा रस्त्यांवर अरेरावी
चारोटीत अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका
कासा, ता. ५ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत चारोटीतील एशियन पेट्रोल पंप परिसरातील सेवा रस्त्यावर अवजड वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे स्थानिकांना मुख्य महामार्गावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
चारोटीतील एशियन पेट्रोल पंप परिसरातील पूर्वी असलेल्या ‘कट’मुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता. तो बंद केल्याने अपघात सत्र कमी झाले होते. अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी येथे स्वतंत्र सेवा रस्ता उभारला होता; मात्र सेवा रस्त्याचा उद्देशच धुळीस मिळाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पेट्रोल पंपावरील सीएनजी भरण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांमुळे सेवा रस्ता अडवला जात आहे. परिणामी, पुन्हा धोकादायक परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. सुरक्षिततेसाठी उभारलेला सेवा रस्ता जर खासगी पार्किंगसारखा वापरला जात असेल, तर हा सार्वजनिक सुविधेचा सरळसरळ गैरवापर असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
-------------------------------------
कारवाईची मागणी
वाहतुकीची कोंडी, अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग, सीएनजीच्या रांगांमुळे अपघातांचा धोका पुन्हा वाढू लागल्याची भीती आहे. त्यामुळे गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सेवा रस्ता मोकळा करावा तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्ता (DA) तब्बल 58% वर; महाराष्ट्राबाबत काय निर्णय?

चेहऱ्यावरचे बारीक केस काढायचे आहेत? फक्त ‘ही’ घरगुती ट्रिक करा अन् पाहा फरक

T20 WC, IND vs ENG: भारत - इंग्लंड सामन्यादरम्यान पावसाचा अडथळा येणार? कसे असेल वातावरण आणि फ्रीमध्ये कसा पाहाणार सामना?

तोतया पोलिसांना बसणार लगाम! अधिकारी, अंमलदारांना एनएफसी-क्यूआरयुक्त नवी ओळखपत्रे मिळणार

Latest Marathi News Live Update : धुळ्यातील साक्री येथील हनुमंतपाडा येथे पुतणी सोबत बोलण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT