मुरबाड, ता. ५ (बातमीदार) : नागरिकांच्या विविध महसूलविषयक कामांसाठी सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुरबाड तहसील कार्यालयातर्फे शनिवारी (ता. ७) ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ शिबिर घेण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांना विविध प्रमाणपत्रे व महसूल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती तहसीलदार अभिजित देशमुख यांनी दिली.
शिबिरात नागरिकांना उत्पन्न, रहिवासी, अधिवास, नॉन-क्रिमीलेअर आणि जातीचे दाखले देण्यात येणार आहेत. तसेच ७/१२ आणि ८-अ उताऱ्यांचे वितरण करण्यात येणार असून, विविध महसूल सेवाही मिळणार आहेत. या दरम्यान बिनशेती परवान्याबाबत माहिती व मार्गदर्शन नागरिकांना दिले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी करण्यासाठी ई-मोजणी अर्ज स्वीकारण्याची सुविधाही शिबिरात उपलब्ध राहणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार सुषमा बांगर यांनी दिली. दरम्यान, शिबिराच्या दिवशी नागरिकांनी आपली मूळ कागदपत्रे तसेच त्यांची झेरॉक्स प्रत सोबत घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन महसूल नायब तहसीलदार अमोल शिंदे यांनी केले आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन प्रलंबित महसूल कामांचा निपटारा करून घ्यावा, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.