मुंबई

बेकायदा भरावामुळे १० लाखांचा दंड

CD

बेकायदा भरावामुळे १० लाखांचा दंड
चिंचणी खाडी क्षेत्रात महसूल विभागाची कारवाई
तारापूर, ता. ५ (बातमीदार)ः चिंचणी, तारापूर खाडी क्षेत्राजवळ बेकायदा माती भराव केला जात आहे. याच अनुषंगाने डहाणू महसूल विभागाने खाडी क्षेत्राजवळ माती भरावावरील बेकायदा बांधकामांविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे.
चिंचणी तारापूर बाह्यवळण मार्गालगत सर्व्हे क्रमांक २३४९ वरील जागेमध्ये महसूल विभागाच्या आवश्यक परवानगीशिवाय १०० ब्रास मातीचा अवैध भराव करण्यात आला होता. मातीच्या भरावामुळे खाडीचे क्षेत्र अरुंद होऊन भरती ओहोटीला अडथळा येण्याची शक्यता होती. त्याचप्रमाणे जवळच असलेल्या कांदळवनाला धोका निर्माण होतो. याप्रकरणी चिंचणी ग्रामपंचायत सदस्या नेहा धर्ममेहेर यांनी महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर चिंचणीचे मंडळ अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करताना कारवाईबाबतचा अहवाल डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार मंडळ अधिकारी यांच्या अहवालानुसार जमीन मालक अब्दुल मजीद कुरेशीकडे भरावाबाबत खुलासा मागितला होता. या वेळी जमीनमालकाने १०० ब्रास अवैध माती भराव केल्याचे कबूल केल्यानंतर १० लाख १६ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
------------------------
चिंचणी बाह्यवळण मार्गालगत कांदळवन क्षेत्राजवळ बेकायदेशीर गौण खनिजाचा भराव केला जात आहे. यासंदर्भात मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी गौण खनिजाचा बेकायदेशीर भराव निदर्शनास आल्याने दंड आकारण्यात आला आहे.
- नेहा धर्ममेहेर, ग्रामपंचायत सदस्य, चिंचणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारचं हेच महागाई नियंत्रणाचं सूत्र, शरद पवारांचा गॅस दरवाढीवरून टोला; शेवटी इशाराही दिला

26/11 वेळी 20 गरोदर महिलांचे प्राण वाचवणारी ती परिचारिका कोण ? कंगनाने साकारलीय भूमिका

Photos : 1000 वर्षे जुनी प्राचीन शिलालेखांची कलाकृती सापडली; काळाच्या ओघात दडलेला 7व्या- 8व्या शतकाचा इतिहास, फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही

Mumbai: मुंबईत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, मित्र-मैत्रिणींसोबत मद्यपान केले अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT