प्रवीण शेट्टींची बिनविरोध निवड
वसई-विरार पालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी
विरार, ता. ५ (बातमीदार)ः वसई-विरार पालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी बहुजन विकास आघाडीचे प्रवीण शेट्टी यांची बिनविरोध निवड झाली.
वसई-विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. पालिकेत बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील महापौर म्हणून निवडून आले. त्यानंतर आज स्थायी समिती सभापतिपदासाठी निवडणूक झाली. निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीतर्फे माजी महापौर प्रवीण शेट्टी, तर भाजपकडून नीलेश चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या वेळी निवडणूक आज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.इंदुमती जाखड यांच्या अध्यक्षतेत दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सुरुवात झाली. पण भाजपचे नीलेश चौधरी यांनी उमेदवारी मागे घेतल्याने बहुजनचे प्रवीण शेट्टी यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर प्रवीण शेट्टी यांचे महापौर अजीव पाटील, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, उप-महापौर मार्शल लोपीस, माजी महापौर नारायण मानकर यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.