कचऱ्याला लागलेल्या आगीत सहा वाहने जळून खाक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : मोकळ्या जागेतील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे जवळच उभी असलेली सहा चारचाकी वाहने जळून खाक झाल्याची घटना वागळे इस्टेट परिसराच्या मार्ग क्रमांक २८ येथे गुरुवारी (ता. ५) घडली आहे. तसेच या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. सुमारे तासाभराने अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश प्राप्त केल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापनाने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील वागळे इस्टेट, मार्ग क्रमांक २८, हनुमान नगर येथील अच्युतानंद ऑटो गॅरेजमधील मोकळ्या जागेत सहा चारचाकी वाहने पार्क केली होती. त्या वाहनांच्या आजूबाजूला पडलेल्या कचऱ्याला अचानक आग लागली. त्या आगीची झळ त्या गाड्यांना बसल्याने त्यांनी पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी श्रीनगर पोलिस, अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेतली. त्यांनी तातडीने त्या आगीवर शर्थीने नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केल्यावर सुमारे तासाभराने आगीवर नियंत्रणात मिळवण्यास यश आले. महत्त्वाचे म्हणजे या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी, दोन भंगारातील गाड्यांसह अन्य चार गाड्यांना आगीची झळ बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर गॅरेज बाबू बेहरा यांच्या मालकीचे असून, या वेळी दोन अग्निशमन दलाच्या गाड्यांसह, दोन बचाव पथकाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्याची माहिती महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.